india china standoff news : भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाख सीमेवर गेल्या काही वर्षांपासून तनावाचे वातावरण आहे. २०२२ पासून दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत. हा सुरू सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, चीनच्या कुरपती पाहता भारताने चीन सीमेजवळ आणखी सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १० हजार सैनिकांची अतिरिक्त कुमक ही चीन सीमेवर तैनात करण्यात आली आहे. भारताच्या या पावलामुळे चीनने आगपाखड केली असून विवादित सीमेवर अधिक सैन्य तैनात करण्याचे भारताचे पाऊल तनाव आणखी वाढवेल असे चीनने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने आपल्या पश्चिम सीमेवरून १० हजार सैनिकांची तुकडी हलवली आहे. हे सैन्य चीनसोबतची विवादित सीमा मजबूत करण्यासाठी उत्तर सीमेजवळ तैनात करण्यात आली आहे. भारताच्या या धोरणात्मक हालचालीमुळे चीन संतापला आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ झेडोंग म्हणाले, "सीमा आणि त्याच्या आसपासच्या भागात शांतता आणि स्थैर्यासाठी आम्ही भारतासोबत एकत्र काम करण्यास तयार आहोत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी एलएसीबाबत भारताची पावले आवश्यक आहेत.
चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बरेलीमध्ये स्थित नॉर्थ इंडिया यूबी) क्षेत्राला आर्मी कोअरमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. सध्या ही लष्करी यंत्रणा प्रामुख्याने प्रशासकीय, प्रशिक्षण आणि इतर शांतता राखण्यासाठी स्थापित करण्यात आली आहे. दरम्यान, आता यात मोठा बदल करून त्यात अतिरिक्त पायदळ, तोफखाना, विमानचालन, हवाई संरक्षण आणि इंजिनियर ब्रिगेडसह याचे रूपांतर कोअरमध्ये केले जाणार आहे.
हिंदुस्तान टाईम्स (एचटी) शी बोलताना, उत्तरी लष्कराचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल डीएस हुडा (निवृत्त) म्हणाले की, "उत्तर भारत (यूबी) क्षेत्रामध्ये एलएसीसह काही ऑपरेशनल जबाबदाऱ्या लष्करावर आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय जबाबदारी देखील आहे." येथील हेडक्वार्टर आणि हा भाग युद्धासारख्या परिस्थितीत सुसज्ज नव्हता. त्यामुळे या परिसराच्या सुरक्षेसाठी या मध्यवर्ती भागासाठी येथे अतिरिक्त सैन्य तैनात केले जाईल. यासोबतच यूबी क्षेत्राचे कॉर्प्स मुख्यालयात रूपांतर करणे हे एक चांगले पाऊल आहे. यामुळे चीनवरही वचक बसेल. चीनच्या LAC वर वाढत्या कुरपतीला हे चांगले उत्तर आहे. भारत आणि चीन दरम्यान, तब्बल ३ हजार ४८८ किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) मध्यवर्ती क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी UB क्षेत्राला ऑपरेशनल कॉर्प्समध्ये रूपांतर करावे अशी लष्कराची इच्छा आहे.
भारत आणि चीन यांनी यापूर्वी लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे आणि अलीकडेच सीमा समस्या सोडवण्याबाबत बैठकही झाली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग पुढे म्हणाले, "सीमा भागातील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. दरम्यान, भारताचे हे पाऊल शांतता राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी अनुकूल नाही." हे योग्य नाही.
भारताने हिमालयातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील चीनसोबतच्या शहराच्या ५३२ किमी (३३१ मैल) सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याच्या पश्चिम सीमेवरून १० हजार सैन्य कमी करून उत्तर सीमेवर तैनात केले आहे. या कारवाईमुळे संतापलेल्या चीनने म्हटले आहे की, "सीमा भागात भारताने लष्करी तैनाती वाढवल्याने सीमाभागातील परिस्थिती शांत होण्यास किंवा या भागात शांतता आणि सुरक्षा राखण्यास मदत होणार नाही."
संबंधित बातम्या