Sikh leader Hardeep Singh Nijjar: भारत आणि कॅनडाचे संबंध आता आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारता विरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. ब्रिटिश कोलंबियातील प्रमुख शीख नेते आणि खलीस्थान समर्थक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्तेमागे भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचे जस्टीन ट्रूडो म्हणाले.
खलीस्थान समर्थक हरदीप सिंग निज्जर यांची जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियातील एका मंदिराबाहेर हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे शीख फुटीरतावादी आणि भारत सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान त्यांच्या हत्तेवरुन जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासूंन दोन्ही देशांतील संबंध हे ताणले गेले आहे. नुकत्याच झालेल्या जी २० बैठकीत देखील याचे पडसाद दिसले. दरम्यान, जस्टीन ट्रूडो हे ओटावा येथील विधान सभेत बोलतांना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले. कॅनडाच्या अंतर्गत बाबीत भारताच्या गुप्तचर यंत्रणा नाक खुपसत असल्याचे जस्टीन ट्रूडो म्हणाले. या सोबतच त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या जी २० बैठकीत भारतीय समकक्ष नरेंद्र मोदी यांच्याशी देखील या बाबत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये परदेशी सरकारचा कोणताही सहभाग हा कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे ट्रूडो म्हणाले.
कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, त्यांनी कॅनडातील भारताच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला देशाबाहेर काढून टाकले आहे. गेल्या आठवड्यात, कॅनडा आणि भारत यांच्या दरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार होती. मात्र, जस्टीन ट्रूडो सरकारने याला स्थगिती दिली आहे.
कॅनडामध्ये खलीस्थान समर्थकांचे भारतीय दुतावासावरील हल्ले वाढले आहे. या बाबत भारताने कॅनडा सरकारवर आपला निषेध नोंदवला होता. तसेच खलीस्थान समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. भारताच्या विभाजनासाठी शीख फुटीरतावाद्यांचा मोठा गट कॅनडामध्ये सक्रिय आहे. तेथून भारताविरोधी कारवाया केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.
टोरंटो विद्यापीठातील G20 रिसर्च ग्रुपचे संचालक जॉन किर्टन म्हणाले की, नवी दिल्लीतील शिखर परिषदेत कॅनेडियन आणि भारतीय शिष्टमंडळांमध्ये हा वाद प्रामुख्याने दिसून आला. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. जागतिक शीख संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे: "कॅनडाने हरदीपसिंग निज्जरच्या लक्ष्यित हत्याकांडात सामील असलेल्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी.