मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India Canada : भारत-कॅनडा वादात आनंद महिंद्रांची उडी.. कॅनडाला धक्का देत मोठ्या निर्णयाची घोषणा

India Canada : भारत-कॅनडा वादात आनंद महिंद्रांची उडी.. कॅनडाला धक्का देत मोठ्या निर्णयाची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 21, 2023 07:08 PM IST

Anandmahindra : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेत कॅनडातील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Anand mahindra
Anand mahindra

जून महिन्यात खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली. या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा जस्टिन ट्रुडो यांनी थेट कॅनडाच्या संसदेत केल्याने त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. भारतातील नागरिकांनी कॅनडामध्ये सावधानता बाळगावी, असे निर्देश देत कॅनडियन नागरिकांना भारतीय व्हिसा बंदी केली आहे. भारत कॅनडाच्या या ताणलेल्या संबंधात आता आनंद महिंद्रा यांनी उडी घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेत कॅनडातील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-कॅनडा वादाचा मोठा परिणाम आतंरराष्ट्रीय व्यवसायावर पहायला मिळत आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच आनंद महिंद्रा यांनी कॅनडाला जबरदस्त झटका दिला आहे.

आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडामधून आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. महिंद्र अँड महिंद्रा कंपनीची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये ११.१८ टक्के भागीदारी आहे. कंपनीने कॅनडामधील आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. कॅनडासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

 

रेसन कॉर्पोरेशन २० सप्टेंबरपासून कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करत असल्याची माहिती कंपनीने शेअर मार्केटमध्ये जाहीर केली. आनंद महिंद्रा यांच्या कंपनीने एका दिवसात कॅनडातील कामकाज बंद केले आहे. कामकाज बंद करण्यासाठी मंजुरीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे कंपनीने अवघ्या काही तासांत मिळवली आहेत. कंपनीला याबाबत महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की त्यांची कॅनडास्थित कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने तेथे आपले कामकाज बंद केले आहे. कंपनीने स्वेच्छेने कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

WhatsApp channel

विभाग