मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नामशेष झालेला चित्ता भारतात येणार, नामिबियातून प्रवास सुरू

नामशेष झालेला चित्ता भारतात येणार, नामिबियातून प्रवास सुरू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 17, 2022 04:12 PM IST

Cheetah: भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याची प्रजाती नामिबियातून भारतात आणली जात आहे. त्यासाठी ४ नर आणि ४ मादी चित्त्यांची वैदकीय तपासणी नामबियात पूर्ण झालीय.

नामबियातून ८ चित्ते येणार भारतात
नामबियातून ८ चित्ते येणार भारतात (AFP)

Cheetah: भारतातून चित्त्याची प्रजाती नामशेष होऊन साधारण ५५ ते ६० वर्षे झाली आहेत. जगभरात चित्त्यांची संख्या केवळ ७ हजार इतकी उरली आहे. विशेष म्हणजे यातले अर्धे चित्ते हे एकट्या नामबियात आहेत. आता भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना नामबियातून आणण्यात येत आहे. भारत आणि नामबिया यांच्यात ८ चित्त्यांसाठी एक करार झाला आहे. यानुसार नामबियातून ८ चित्ते आणले जात आहेत. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमद्ये त्यांना ठेवले जाईल. या ठिकाणी चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविट आणि रानडुकरं मोठ्या संख्येनं असल्यानं त्यांना इथे ठेवण्यात येणार आहे.

भारतात आणण्यात येणाऱ्या ८ चित्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्व चित्ते एकाच वेळी भारतात आणण्याचं वाहतुकीच्या दृश्टीने आव्हान आहे. यासाठी सीसीएफ भारत, दक्षिण आफ्रिका आणि नामबिया एकत्र मिळून काम करत आहेत. जमिनीवर आणि हवाई मार्गे वाहतुकीसाठी योग्य समन्वय साधला जात असल्याचं नामबियाने म्हटलं आहे.

<p>नामबियातून भारतात आणण्यात येत असलेल्या चित्त्यांची वैदकीय तपासणी पूर्ण</p>
नामबियातून भारतात आणण्यात येत असलेल्या चित्त्यांची वैदकीय तपासणी पूर्ण (फोटो - पीटीआय)

कुनोमध्ये बिबट्या असल्याने काही चिंता नाहीय. कुनो नॅशनलपार्कमध्ये सिंह किंवा हायना नाहीत. मात्र बऱ्याच बिबट्यांचा वावर आहे. आफ्रिकन चित्ता हा जंगली मार्गांबद्दल आणि इतर मांसाहारी प्राण्यांचा सहवास स्वीकारतो. त्यामुळे त्याबाबत काही काळजी नाही असं वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

नामबियातून भारतात आणण्यात येणाऱ्या चित्त्यांपैकी ४ नर तर ४ मादी आहेत. यापैकी दोन लहान असून इतर पूर्ण वाढ झालेले चित्ते असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांना आणण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यात आहे. त्यात पहिल्या टप्प्यात नामबियातील चित्ते या महिन्यात भारतात आणले जातील असं सांगण्यात येत आहे. येत्या पाच वर्षात भारतात या चित्त्यांची संख्या ३० होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चित्ते भारताता आणण्याचा उद्देश फक्त एक नामशेष होत असलेली प्रजाती भारतात आणणं असा नाही. तर याच्या माध्यमातून भारत सरकारचा उद्देश जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरणाचे संतुलन साधण्याचा आहे. नामबियासोबत करारामुले ७० वर्षांनी भारतात पहिल्यांदा चित्ता दिसेल. १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा चित्ता भारतीय जंगलात दिसेल. जगातील सर्वात वेगवान प्राणी असणारा चित्ता ११३ किमी प्रति तास वेगाने धावू शकतो.

IPL_Entry_Point

विभाग