Rahul Gandhi On Adani: संरक्षण क्षेत्रातील अदानींच्या कंपनीत चिनी व्यक्तीची गुतंवणूक, राहुल गांधींची चौकशीची मागणी
Rahul Gandhi targets Adani : गौतम अदानींनी शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे?अदानींचे की अन्य कोणाचे?याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
Rahul Gandhi On Gautam Adani :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. याआधी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राहुल गांधी म्हणाले की,आम्ही जगाला दाखवतो की आमच्या आर्थिक बाबी पारदर्शक आहेत. नरेंद्र मोदींनी या सगळ्यांची उत्तरं द्यावी. अदानी प्रकरणाचीसंयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी,अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा?',क्लीन चिट देणारा सेबीचा माणूस अदानी कंपनी संचालकहोता, असा आरोपराहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल म्हणाले की,पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने (गौतम अदानी) शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे?अदानींचे की अन्य कोणाचे?याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी संसदीय चौकशी समिती नेमली पाहिजे.
राहुल गांधींचे प्रश्न -
उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्ती चांग चुंग लिंग यांची मोठी गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी.
अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आले.
याच पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी.
विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा?
अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे याची चौकशी केली पाहिजे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्ती चँग चुन लीन यांची मोठी गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी.
अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आले.
याच पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी.
विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लीन यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा?
अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे याची चौकशी केली पाहिजे.
विभाग