PM Modi Live: स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले असून ते मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. दरम्यान, २००४ ते २०१४ या काळात लाल किल्ल्यावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंहने १० वेळा देशाला संबंधित केले होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांना मागे टाकले. नरेंद्र मोदी हे अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून जनेतेला संबोधित करत आहेत. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी अनुक्रमे १७ आणि १६ वेळा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केले. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,'आजच्या दिवशी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, फासावर चढणाऱ्या आणि भारत माता की जय, अगणित भारत माता'चा नारा लावणाऱ्यांचे स्मरण करतो. देशातील वीर पुत्रांची आठवण करण्याचा दिवस आहे.
'भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे माझे स्वप्न देशातील १४० कोटी लोकांच्या संकल्प आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. 'विकित भारत २०४७ हे केवळ शब्द नाहीत, तर ते १४० कोटी जनतेच्या संकल्पाचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत. आपल्या संकल्पाने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यास आपण सक्षम आहोत', असेही मोदी म्हणाले.
यावर्षी आणि गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे आपण सर्व जण अधिक चिंतेत आहोत. राष्ट्रीय आपत्तीत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रती मोदींनी संवेदना व्यक्त केल्या. केरळच्या वायनाड मध्ये ३० जुलै रोजी भूस्खलनात २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत वाढत्या नैसर्गिक आपत्तींबद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली. तसेच या संकट काळात देश त्यांच्या पाठीशी असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारांनी महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेण्याची आणि या गुन्हेगारांमध्ये शिक्षेची भीती निर्माण करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.
किरकोळ कारणावरून लोकांना तुरुंगात पाठवणारे जुने कायदे आपल्या सरकारने रद्द केले आणि नंतर त्यात बदल करून नागरिकांना न्याय दिला, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने सुमारे १५०० कायदे रद्द करून शिक्षेपेक्षा न्यायाला प्राधान्य दिले आहे.किरकोळ कारणावरून लोकांना तुरुंगात पाठवणारे सर्व कायदे संपुष्टात आले आहेत. नव्या फौजदारी कायद्यांमुळे फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा झाली आहे, असे मोदी म्हणाले. तसेच धर्मनिरपेक्ष नागरी कायदा ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातील हिंसाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 'बांगलादेशमध्ये जे काही घडले, ते अत्यंत वाईट आहे. आशा आहे की, तिथली परिस्थिती लवकरच सामान्य होईल. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समजाची सुरक्षा महत्त्वाची आहे. तेथील हिंदुची सुरक्षा सुनिश्चित व्हावी, अशी भारतीयांची इच्छा आहे. शेजारच्या देशांनी सुख आणि शांतीचा मार्ग अवलंबावा, अशी भारताची इच्छा असते.'
नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देत आहे. येणाऱ्या दिवसात भारताचे खेळाडूंचे आणखी पथक पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅराऑलिम्पिकसाठी जात आहे. त्या सर्वांना शुभेच्छा. भारताने जी२० चे आयोजन केले. भारत मोठे इव्हेंट आयोजित करू शकतो, हे आपण दाखवून दिले. यामुळे २०३६ मध्ये होत असलेले ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावे, असे माझे स्वप्न आहे.
'जेव्हा प्रत्येक कुटुंबात स्वच्छ वातावरण निर्माण होते, ते भारतामध्ये आलेल्या नव्या चेतनेचे प्रतिबिंब असते. आज आपल्या देशात तीन कोटी कुटुंबे आहेत, ज्यांना नळाला पाणी मिळत आहे. आज २५ कोटी कुटुंबे त्याचे लाभ घेत आहेत. दलित, आदिवासी, गरीब लोक या गोष्टींच्या अभावी जगत होते. प्राथमिक गरजांसाठी आम्ही दिलेल्या पुराव्याचा लाभ जनतेला मिळत आहे. आम्ही लोकलसाठी व्होकलचा मंत्र दिला. एक वन डिस्ट्रिक्ट-वन प्रोडक्टची कल्पना दिली. त्याचा परिणाम दिसू लागला आहे', असेही मोदी म्हणाले.