मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Income Tax Department Recruitment 2023: Check Posts, Qualification And How To Apply

Income Tax Recruitment 2023 : एक लाखापेक्षाही जास्त पगार; इन्कम टॅक्स विभागात विविध पदांसाठी भरती

Job 2023
Job 2023 (HT)
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Feb 27, 2023 12:20 PM IST

Government Job: आयकर विभागात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात इंस्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरती अभियानात एकूण २० पदे भरली जाणार आहेत.  या पदांसाठी इच्छुक उमेदवार आयकर चंदीगडच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑफलाईन नोंदणी सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

ट्रेंडिंग न्यूज

इनकम टॅक्स इंस्पेक्टर आणि टॅक्स असिस्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. तर, मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवाराला १० वी उतीर्णची मर्यादा ठेवण्यात आली आहे. इनकम टॅक्स इंस्पेक्टर पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय ३० वर्ष पूर्ण पाहिजेत. त्यानंतर टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १८ ते २७ वयोगटातील असावा. याशिवाय, मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ असणे गरजेचे आहे.

इनकम टॅक्स इंस्पेक्टरपदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला ४४९००- १४२४०० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर, टॅक्स असिस्टंट पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला २५५००- ८११०० हजार रुपये मासिक वेतन मिळणार नाही. याशिवाय, मल्टी टास्किंग स्टाफसाठी मासिक वेतन १८०००- ५६९०० हजार रुपये इतके ठरवण्यात आले आहे.

आयकर विभागात २१ फेब्रुवारीपासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  या पदांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज रजिस्टर्ड डाक किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून Dy. Commissioner of Income Tax (Hq)(Admn), O/o the Principal Chief Commissioner of Income Tax, NWR, Aayakar Bhawan, Sector-17E, Chandigarh-160017 या पत्त्यावर पाठवावे लागतील.

WhatsApp channel