Viral News: स्वतःचे घर असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वेळा माणूस देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या स्वप्नातील घर बांधून शांतता मिळवण्यासाठी तयार असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी काही राज्य आहेत, तिथे आपण जमीन खरेदी करू शकत नाहीत.
अनेकदा शांततेच्या शोधात, लोक दूर कुठेतरी, हिल स्टेशन किंवा समुद्राजवळ घर बांधण्याचे स्वप्न पाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही.
हिमाचल प्रदेश हे भारतातील हिल स्टेशनसाठीही खूप प्रसिद्ध आहे. परंतु, येथे बाहेरील लोकांना मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, १९७२ च्या जमीन कायद्याचे कलम ११८ लागू झाले आणि त्यानुसार हिमाचल प्रदेशमध्ये कोणताही बिगर शेतकरी किंवा बाहेरील व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकत नाही.याशिवाय, नागालँडमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. कारण १९६३ साली राज्याच्या निर्मितीबरोबरच कलम ३७१ एची तरतूद विशेष अधिकार म्हणून देण्यात आली. त्यानुसार येथे जमीन खरेदी करण्यास परवानगी नाही.
बाहेरचे लोक सिक्कीममध्ये जमीन खरेदी करू शकत नाहीत. सिक्कीममध्ये फक्त सिक्कीममधील रहिवासी जमीन खरेदी करू शकतात. भारतीय राज्यघटनेचे कलम ३७१ एएफ जे सिक्कीमला विशेष तरतुदी प्रदान करते, बाहेरील लोकांना जमीन किंवा मालमत्तेची विक्री आणि खरेदी करण्यास मनाई करते.
अरुणाचल प्रदेश हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. परंतु, या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासही परवानगी नाही. येथे शासनाच्या मंजुरीनंतरच शेतजमीन हस्तांतरित केली जाते. या ठिकाणांव्यतिरिक्त, मिझोरम, मेघालय आणि मणिपूर ही अशी राज्ये आहेत, जिथे मालमत्ता खरेदीशी संबंधित अनेक कायदे आणि नियम आहेत. याशिवाय ईशान्येकडील रहिवासी एकमेकांच्या राज्यात जमीन खरेदी करू शकत नाहीत.
संबंधित बातम्या