खळबळजनक! मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून पतीनं केली हत्या!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून पतीनं केली हत्या!

खळबळजनक! मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून पतीनं केली हत्या!

Nov 05, 2024 02:47 PM IST

uttar pradesh crime : उत्तर प्रदेशातील वाराणसीतील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या भदैनी भागात राजेंद्र गुप्ता या तरुणाने तीन मुले आणि पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.

खळबळजनक! मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून पतीनं केली हत्या!
खळबळजनक! मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून पतीनं केली हत्या!

uttar pradesh varanasi crime : राजधानी दिल्लीत एकाने अंधश्रद्धेतून एकाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झालं होतं. ही घटना ताजी असतांना आता उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे.  वाराणसी जिल्ह्यात  भेलूपूर पोलीस ठाण्याच्या भदायनी भागात ही घटना घडली आहे. एका तरुणाने मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नी आणि तीन मुलांची  गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. तर नीतू गुप्ता (वय ४५), मुलगा नवनीत गुप्ता (वय २५), मुलगा शुभेंद्र गुप्ता (वय १५) आणि मुलगी गौरांगी गुप्ता (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भदैनी येथील पॉवर हाऊससमोरील गल्लीत राजेंद्र गुप्ता हे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी नीतू, मुलगी गौरांगी, मुले नवेंद्र व सुबेंद्र असा परिवार आहे. मंगळवारी शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस राजेंद्र यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना चार मृतदेह पडलेले दिसले आणि पती राजेंद्र घरातून गायब होता. घटनेच्या वेळी त्याची वृद्ध आई घरात होती पण तिला काहीच कळत नव्हते.

राजेंद्र हा तांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. ज्योतिषाच्या सांगण्यावरून राजेंद्र आपल्या पत्नीला आपल्या कामात अडथळा समजू लागला. याच कारणामुळे राजेंद्रने पत्नी आणि मुलांची हत्या केली आहे. पोलिसांनी राजेंद्र तसेच तांत्रिकाचा शोध सुरू केला आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर