Shooting at New York : अमेरिकेत आणखी एक हल्ला झाला आहे. न्यूयॉर्क क्वीन्स भागात हा हल्ला झाला असून यात ११ जणांना गोळी लागल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण जखमी झाले आहेत. न्यू ऑरलियन्समध्ये शमसुद्दीन जब्बार याने नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करणाऱ्या जमावावर ट्रकला धडक दिल्याने १५ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतांना आता आणखी एकाने ११ जणांवर गोळीबार केला आहे.
अमेरिकेत आणखी एक हल्ला झाला आहे. न्यूयॉर्क क्वीन्स भागात हा हल्ला झाला असून यात ११ जणांना गोळी लागल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण जखमी झाले आहेत. न्यू ऑरलियन्समध्ये शमसुद्दीन जब्बार नावाच्या व्यक्तीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करणाऱ्या जमावावर ट्रकला धडक दिल्याने १५ जण ठार झाले होते.
न्यूयॉर्क क्वीन्स भागात हा हल्ला झाला असून यात ११ जणांना गोळी लागल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी हा गोळीबार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, क्वीन्स परिसरातील अजुरा नाईट क्लबमध्ये हा गोळीबार झाला, ज्यात ११ जण जखमी झाले. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच न्यूयॉर्क पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
हा गोळीबार कोणी केला आणि त्याचा हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही. ऑरलियन्समध्ये झालेल्या ट्रक हल्ल्यानंतर गोळीबार झाला. यापूर्वी झालेल्या ट्रक हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. पिकअप ट्रकचा चालक शमसुद्दीन याने नववर्ष साजरे करणाऱ्या जमावावर हल्ला करून १५ जणांचा बळी घेतला होता. याशिवाय मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शमसुद्दीन ज्या ट्रकचालवत होता त्या ट्रकमध्ये इस्लामिक स्टेटचा झेंडा सापडला होता. इतकंच नाही तर शमसुद्दीनच्या काही व्हिडिओंबाबतही माहिती मिळाली आहे, ज्यात त्याने हत्या केल्याची माहिती दिली आहे.
अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे झालेल्या हल्ल्याचा तपास आता दहशतवादी दृष्टिकोनातून केला जात आहे. या घटनेत अमेरिकन लष्करात सेवा बजावलेल्या शमसुद्दीन जब्बार या व्यक्तीचे नाव समोर येत आहे. सध्या जब्बार यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का ? याचा तपास केला जात आहे.
शमसुद्दीन जब्बार (वय ४२) असे या कारचालकाचे नाव आहे. तो टेक्सासचा रहिवासी असून तो रिअल इस्टेट एजंट असल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जब्बारने २००७ ते २०१५ दरम्यान अमेरिकन लष्करात मानव संसाधन विशेषज्ञ आणि आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम केले आहे. त्याने २०२० पर्यंत लष्करात काम केले. फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१० या कालावधीत तो अफगाणिस्तानात कार्यरत होता. स्टाफ सार्जंट पदावरून तो निवृत्त झाल्याची माहिती आहे. जब्बारवर २००२ मध्ये चोरी आणि २००५ मध्ये बेकायदेशीर परवाना वापरण्यासारख्या किरकोळ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याने दोन लग्न केले असून २०२२ मध्ये त्याने दुसऱ्या पत्नीपासून देखील त्याने घटस्फोट घेतला आहे.
पत्नीच्या वकिलांना पाठवलेल्या ईमेलमध्ये त्याने आर्थिक अडचणींचा उल्लेख केला होता. घराचे पैसे देण्यास असमर्थ असल्याचे देखील त्याने लिहिले होते. गेल्या वर्षी कंपनीला २८ हजार डॉलरपेक्षा जास्त तोटा झाल्याचेही सांगण्यात आले.
एफबीआयने सांगितले की, शहरातील वर्दळीचा मार्ग असलेल्या फ्रेंच क्वार्टरमधील बोरबन स्ट्रीटवर बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्याने अनेकांना कारने चिरडले. या हल्ल्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याला ठार मारण्यात आलं. त्याच्या गाडीत तपासकर्त्यांना एक हँडगन आणि एआर स्टाईलची रायफल मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. एफबीआयने सांगितले की, त्याच्या गाडीत एक संभाव्य स्फोटक डिव्हाइस देखील सापडले आहे. या सह कारमध्ये इसिसचा झेंडाही सापडला असल्याचे समोर आहे आले आहे. या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या