Manipur news : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमार मधील दहशत वाद्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार म्यानमारमधून सुमारे ९०० दहशतवादी मणिपूरमध्ये दाखल झाले असून ते मोठा घातपात घडवण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, कुकी दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. म्यानमारला लागून असलेल्या डोंगराळ भागात विशेष सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या भागात कुकीचे समाजाचे वर्चस्व आहे.
रिपोर्ट्सनुसार, म्यानमारमधून घुसखोरी केलेले हे दहशतवादी ड्रोन चालवण्यातही माहीर आहेत. कुलदीप सिंह था म्हणाले की, गुप्तचर विभागाच्या या अहवालामुळे सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. हा अहवाल सर्व जिल्ह्यांच्या एसपी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये येणारे दहशतवादी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागण्यात माहिर आहेत. तसेच जंगलात लढण्यात देखील माहिर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत
अहवालात असे म्हटले आहे की हे दहशतवादी 30-30 च्या गटात राज्यभरात घुसण्याच्या इराद्यात आहेत. यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकत्रितपणे मेईतेई गावांना लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार आहे. याबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, हे १०० टक्के बरोबर आहे. इंटेलिजन्स इनपुटवर विश्वास ठेवून आम्ही योग्य ती तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
म्यानमारमधील सशस्त्र गट जुताईच्या विरोधात लढत आहे आणि त्यांनी त्याचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे. चिन प्रांतात जुटा आणि वांशिक गटांमध्ये भीषण संघर्ष होत आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून जाऊन भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात. वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारात विदेशी शक्तींचाही हात असल्याचं मणिपूर सरकारने अनेकदा सांगितले आहे. म्यानमारमधून होणारी घुसखोरीही हिंसाचाराला कारणीभूत आहे.
१ सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.