Delhi Weather : राज्यात थंडीचा जोर कमी असला तरी विदर्भ, मराठवाड्यात रात्री व पहाटे थंडी वाढली आहे. तर दिवसा तापमानात वाढ होत असून रात्रीच्या तापमानात मोठी घट होत आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्याची चादर असल्याने प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे आणि प्लाइट्सचं वेळापत्रकावर मोठा परिमाण झाला आहे. काही ठिकाणी रेल्वे उशिराने धावत आहे. तर काही ठिकाणी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर विमान उड्डाणाला देखील उशीर झाल्याने काही प्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
दिल्लीतील दाट धुक्यामुळे शुक्रवारी ४०० हून अधिक विमानांना उशीर झाला. तर विविध स्थानकांवर ४० हून अधिक रेल्वे गाड्या उशिराने पोहोचल्या, तर ३५ गाड्या या उशिराने सोडण्यात झाल्या.
शुक्रवारी सकाळी राजधानीत दाट धुके होते. याचा सर्वाधिक परिणाम हवाई वाहतूक आणि रेल्वे सेवेवर दिसून आला. दाट धुक्यातही दिल्ली विमानतळावर विमानसेवा सुरू होती. सूत्रांनी सांगितले की, विमान उतरण्यासाठी धावपट्टीव्हिज्युअल रेंज पुरेशी होती. त्यामुळे कोणतेही विमान अन्य विमानतळांकडे वळविण्यात आले नाही.
प्रवाशांना कॅट-३ वगळता इतर विमानांच्या वेळापत्रकावर लक्ष देण्याचे सांगण्यात आले होते. धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर होऊ शकतो, असे एजन्सीचे म्हणणे आहे. शुक्रवारी २० आंतरराष्ट्रीय उड्डाणांना उशीर झाला. मात्र, दिल्ली विमानतळावरून कोणतेही विमान वळविण्यात आले नाही, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्लीत जीआरएपी-३ चे निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे जीआरएपी ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत खासगी बांधकामे व पाडण्याच्या कामांवर बंदी घालण्यात आली होती. दिल्ली आणि एनसीआर जिल्ह्यात बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रीड पद्धतीने घेण्यात येणार आहेत. शुक्रवारी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३७१ होता. त्यामुळे हे निर्बंध लादण्यात आले होते.
संबंधित बातम्या