कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हद्दच पार केली! मंदिरात घुसून हिंदूंवर केला जीवघेणा हल्ला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हद्दच पार केली! मंदिरात घुसून हिंदूंवर केला जीवघेणा हल्ला

कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हद्दच पार केली! मंदिरात घुसून हिंदूंवर केला जीवघेणा हल्ला

Nov 04, 2024 06:41 AM IST

khalistani attacks hindus in Canada : कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हिंदू मंदिरात जात भारतीय हिंदू नागरिकांवर हल्ले केले आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहे.

कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हद्दच पार केली! मंदिरात घुसून हिंदूंवर केला जीवघेणा हल्ला
कॅनडात खलिस्तानवाद्यांनी हद्दच पार केली! मंदिरात घुसून हिंदूंवर केला जीवघेणा हल्ला (फोटो: X/@AryaCanada)

khalistani attacks hindus in Canada : कॅनडात खलिस्थान वाद्यांनी हद्दच गाठली आहे. थेट मंदिरात घुसून  हिंदू नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांना मंदीरासमोर मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  थेट मंदिरात भाविकांवर झालेल्या हल्ल्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांच्या हिंसाचारावर ट्रूडो सरकारला धारेवर धरले आहे. कॅनडामध्ये अतिरेक्यांना मोकळीक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये काही लोक मंदिरात घुसून नागरिकांवर  हल्ला करताना दिसत आहेत.

आर्या यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी आज लक्ष्मण रेषा ओलांडली. ब्रॅम्प्टनयेथील हिंदू सभा मंदिर परिसरात भारतीय-कॅनेडियन भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने कॅनडात खलिस्तानी हिंसक कट्टरवाद किती खोल आणि धोकादायक पद्धतीने रूजला आहे हे दाखवून दिलं आहे.

कॅनडाच्या राजकारणाव्यतिरिक्त खलिस्तानवाद्यांनी  सरकारी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये घुसखोरी केली आहे, या बातम्यांमध्ये काही तरी तथ्य आहे, असे मला वाटू लागले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलिस्तानवाद्यांना कॅनडात मोकळीक मिळत आहे. हे या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. 

आर्या लिहितात, "मी बऱ्याच  काळापासून सांगत आलो आहे की, आपल्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी हिंदू-कॅनेडियन लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे. या झालेल्या घटणेसाठी  राजकारण्यांना जबाबदार धरलं पाहिजे. याआधी जुलै महिन्यात आर्या यांनी हिंदूवर होत असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना ही घटना घडली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ब्रॅम्प्टनयेथील हिंदू सभेच्या मंदिरात आज घडलेली हिंसाचाराची घटना मान्य नाही. प्रत्येक कॅनडियन व्यक्तीला सुरक्षित वातावरणात मुक्तपणे आपला विश्वास पाळण्याचे स्वातंत्र्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  समाजाचे रक्षण केल्याबद्दल आणि घटनेच्या तपासासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल पील प्रादेशिक पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहे.  

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर