मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व पत्नी बुशरा बीबी यांना दिलासा; १४ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व पत्नी बुशरा बीबी यांना दिलासा; १४ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 01, 2024 07:10 PM IST

Imran Khan : इस्लामाबाद हायकोर्टाने दाम्पत्याला दिलासा दिला. मात्र न्यायालयाने सांगितले की, दोषमुक्तीच्या याचिकेवर ईदच्या सुट्ट्या संपल्यानंतर सुनावणी घेतली जाईल.

 इम्रान खान व पत्नी बुशरा बीबी यांना दिलासा
इम्रान खान व पत्नी बुशरा बीबी यांना दिलासा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. इस्लामाबाद हाईकोर्टाने तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान व त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ठोठावण्यात आलेली १४ वर्षांची शिक्षा स्थगित केली आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस आधी तोशाखानाकडून मिळालेल्या सरकारी भेटवस्तूमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने ३१ जानेवारी २०२४ रोजी दोघांना १४-१४ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दोघांनी या शिक्षेविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. येथे मुख्य न्यायमूर्ती जस्टिस आमिर फारूक यांच्या नेतृत्वात २ सदस्यीय खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी केली.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, रमजान ईदच्या सुट्टीनंतर मुख्य याचिकेवर निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत या जोडप्याची शिक्षा स्थगित राहील. याबाबत पक्षाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

सोमवारी इस्लामाबाद हायकोर्टाने दाम्पत्याला दिलासा दिला. मात्र न्यायालयाने सांगितले की, दोषमुक्तीच्या याचिकेवर ईदच्या सुट्ट्या संपल्यानंतर सुनावणी घेतली जाईल. मात्र इम्रान खान यांची सुटका होऊ शकत नाही, कारण अन्य प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. आरोपातून मुक्त होईपर्यंत त्यांची सुटका केली जाऊ शकत नाही. 


तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात ७१ वर्षीय इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान कार्यकाळात मिळालेल्या सरकारी भेटवस्तू आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तोशाखाना संबंधित नियमानुसार सरकारी अधिकारी किंमत देऊन भेटवस्तू घेऊ शकतात. मात्र आधी भेटवस्तू तोशाखानामध्ये जमा केल्या पाहिजेत. इम्रान खान आणि त्यांची पत्नीने या भेटवस्तू जमा केल्या नाहीत व आपल्या अधिकाराचा गैर फायदा घेत कमी किंमतीत मिळवल्या. ३० जानेवारी रोजी सिफर प्रकरणात १० वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्यात दिवशी इम्रान खान तोशाखाना प्रकरणात दोषी ठरले होते.

IPL_Entry_Point