मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Weather Updates: देशभरात थंडीची लाट, 'या' भागांत अवकाळी पावसाची शक्यता; महाराष्ट्राचं काय?

Weather Updates: देशभरात थंडीची लाट, 'या' भागांत अवकाळी पावसाची शक्यता; महाराष्ट्राचं काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 18, 2024 09:50 AM IST

Maharashtra weather forecast: हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीर येथून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रही गारठणार आहे.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (HT)

Cold Wave in India: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तर, मध्य भारतातील नागरिकांना धुक्यासह थंडीचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील तापमान ४ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले. परिणामी, अनेक विमान उड्डाणे आणि रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये कोल्ड वेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणांवर हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील विविध भागांत पुढील तीन दिवस म्हणजेच आजपासून २१ जानेवारीपर्यंत थंडीची वाढण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये गारपीठ होण्याची शक्यता आहे. तर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्येही थंडी कायम राहणार आहे. तसेच तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कशी परिस्थिती?

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमध्येही थंडीचा प्रकोप वाढणार आहे. तसेच तेथून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रही गारठणार आहे. गेल्या ४८ तासांपासून राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि नजीकच्या परिसरात किमान तापमान २० अंशांहूनही कमी नोंदवण्यात आले आहे. तर, कमाल तापमानाचा आकडाही ३० अंशांपेक्षा कमी झाला आहे.

WhatsApp channel