प्रेमात धोका, बेरोजगारी कि डिप्रेशन? IIT मुंबईचा विद्यार्थी, एअरोस्पेस इंजिनिअर बनला साधू, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रेमात धोका, बेरोजगारी कि डिप्रेशन? IIT मुंबईचा विद्यार्थी, एअरोस्पेस इंजिनिअर बनला साधू, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

प्रेमात धोका, बेरोजगारी कि डिप्रेशन? IIT मुंबईचा विद्यार्थी, एअरोस्पेस इंजिनिअर बनला साधू, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Jan 15, 2025 06:05 PM IST

Iitian Baba : आयआयटी, मुंबईमधून इंजिनिअरिंगची पदवी घेणारा अभय सिंग आता जगातील मोह-मायापासून दूर जात साधू बनला आहे. अभय सत्याच्या वाटेने जात आहे. ज्या लाखो-करोडो लोकांनी 'इंजिनिअर बाबा' चा व्हायरल व्हिडिओ पाहिला ते सर्वजण आश्चर्यचकीत झाले.

आयआयटी बाबाची स्टोरी
आयआयटी बाबाची स्टोरी

prayagraj kumbh mela 2025 : प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक गंगा संगमवर पवित्र स्नान करत आहेत. जवळपास दीड महिना चालणाऱ्या या महाकुंभात मोठ्या संख्येने साधु-संतांनी उपस्थिती लावली आहे. यापैकीच एक आहेत अभय सिंह, जे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. आयआयटी, मुंबईमधून  इंजिनिअरिंगची पदवी घेणारा अभय सिंग आता जगातील मोह-मायापासून दूर जात साधू बनला आहे. अभय सत्याच्या वाटेने जात आहे. ज्या लाखो-करोडो लोकांनी 'इंजिनिअर बाबा' चा व्हायरल व्हिडिओ पाहिला ते सर्वजण आश्चर्यचकीत झाले. अभय सिंह यांनी आता सांगितले की, ते कोणी साधू-महंत नाहीत, तर मोक्षाच्या वाटेवर येणाऱ्या बाधा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील लाखो भाविक आणि पर्यटक गर्दी करत असताना एक अनोखे व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'मसानी गोरख बाबा' या नावाने ओळखले जाणारे अभय सिंह हे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अभय सिंग यांची खासियत म्हणजे त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतली असून त्यांनी आपली चमकदार कारकीर्द सोडून आध्यात्मिक जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी खूप केले अध्ययन -

मसानी गोरख बाबा म्हणतात की, त्यांनी दर्शन, सॉक्रेटिस, प्लेटो यांसारख्या थोर तत्त्ववेत्त्यांच्या कार्याचा अभ्यास करून आपल्या जीवनाचा अर्थ शोधला. आता मला समजले आहे की खरे ज्ञान म्हणजे काय.  मन आणि मानसिक आरोग्य समजून घ्यायचं असेल तर अध्यात्माच्या माध्यमातून करू शकता.

भगवान शंकराचे परमभक्त मसानी गोरख बाबा ऊर्फ अभय सिंह म्हणतात, "मी आता अध्यात्माचा आनंद घेत आहे. मला विज्ञानाच्या माध्यमातून अध्यात्म समजते. सर्व काही शिव आहे. सत्य म्हणजे शिव आणि शिव सुंदर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे जवळपास २९,००० फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या पोस्ट प्रामुख्याने ध्यान, योग आणि प्राचीन स्त्रोतांवर आधारित आहेत.

सोशल मीडियावर अनेक केले जात आहेत दावे - 

आयआयटीची पदवी आणि करिअर सोडून त्याने नवा आध्यात्मिक मार्ग निवडल्याने सोशल मीडियावर केले जाणारे दावेदेखील आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. प्रेमात फसवणूक झाल्याने अभय सिंग यांनी सांसारिक आसक्ती सोडून देवाचा आश्रय घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, बेरोजगारीच्या नैराश्याने त्यांना अध्यात्माकडे वळवले. मात्र त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामागचे खरे कारण खुद्द मसानी गोरख बाबांनाच ठाऊक आहे.

अभय सिंग डिप्रेशनमध्ये होता का?

आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभय सिंह यांना त्यांच्या आयुष्याबद्दल गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागले. करिअरमध्ये काय करायचं याची चिंता त्याला वाटू लागली आणि तो नैराश्यात गेला. मानसिक आरोग्य, चिंता आणि ताणतणावाशी झगडत असताना झोपेच्या समस्या आणि मनाची खोली समजून घेण्यासाठी त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. या काळात ते इस्कॉन आणि कृष्ण यांच्या विचारांकडे वळले, ज्यांनी त्यांना जीवनाच्या अर्थाच्या शोधात मार्गदर्शन केले. त्यांच्या मते हा प्रवास आत्मशोध आणि मनःशांती मिळवण्याचे माध्यम ठरला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर