अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली गळती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली गळती

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली गळती

Nov 16, 2024 01:25 PM IST

sunita williams news in marathi : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्स बाबत मोठी अपडेट पुढे आली आहे. आयआयएस स्थानकाला तब्बल ५० ठिकाणावरून वायु गळती होत असल्याची धक्कादायक माहिती असून या केंद्रातील अंतराळवीरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जीवाला धोका; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तब्बल ५० ठिकाणी गळती
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जीवाला धोका; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तब्बल ५० ठिकाणी गळती (REUTERS)

sunita williams life in danger : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामुळे  (आयएसएस) नासाचं टेंशन वाढलं आहे.  गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात किरकोळ वायु गळती होत होती. मात्र, आता किमान ५० ठिकाणी गळतीची समस्या उद्भवल्याचं स्पष्ट झालं असून या केंद्राला  तडे देखील जात असल्याची माहिती पुढे आली आहे.  नासाने केलेला तपास अहवाल लीक झाला असून त्यात ही माहिती पुढे आली आहे.  यामुले गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या  सुनीता विल्यम्ससह आणखी  काही अंतराळवीरांचा जीव धोक्यात आला आहे. 

पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रयोगशाळेला सूक्ष्म हादरे बसत असल्याचा दावा  रशियाने केला आहे. यावर नासाचे म्हणणे आहे की, अंतराळ स्थानकातून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडत आहे, ही धोक्याची घंटा आहे. मात्र, या केंद्रात अडकून पडलेल्या अंतराळवीरांचे  प्राण वाचवण्यासाठी आणि या लिकेजवर  तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयएसएसमधील गळतीची समस्या गेल्या पाच वर्षांपासून आहे. 

सगळ्यात पहिली वायु गळती ही डॉकिंग पोर्टवर जाण्यासाठी अंतराळ स्थानकात तयार करण्यात आलेल्या पहिल्या  यावेझदा मॉड्यूलमधून सुरू झाली. या भागाचे नियंत्रण रशियाच्या हातात आहे. मात्र, गळतीचे खरे कारण काय या बाबत  नासा आणि रशियन स्पेस एजन्सी रोस्कोमोस यांच्यात अद्याप सहमती झालेली नाही.  सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, नासाचे अंतराळवीर बॉब कबाना यांनी सांगितले की, अंतराळ संस्थेने या गळतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

गळती थांबविण्यासाठी काही प्रयत्न केल्यास या समस्येपासून काही काळ दिलासा मिळू शकेल, पण त्यापासून  कायमस्वरूपी तोडगा काढता येणार नाही,  असे कबाना यांनी सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक  सुरक्षित नसल्याचं  अमेरिकेचे म्हणणं आहे. ही गळती २०१९ मध्ये पहिल्यांदा आढळून आली होती. त्यानंतर एप्रिल २०२४ पासून दररोज १.७ किलो वेगाने हवेची गळती सुरू झाली. साधारणपणे आयएसएसवर सात ते दहा अंतराळवीर असतात. रशियन संशोधकांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सूक्ष्म कंपणं जाणवत असल्याचं म्हटलं आहे. हा धोका टाळण्यासाठी नासाने काही पावले उचलली आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेले अंतराळवीर देखील अतिरिक्त खबरदारी घेत आहेत. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर