मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 18, 2024 01:49 PM IST

Viral Video : कॅनडातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ड्रायव्हर महिला प्रवाशाला म्हणतो की तू जर पाकिस्तानात असती तर तुझे मी अपहरण केले असते. तुम्हाला मिळवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे.

कॅनडातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ड्रायव्हर महिला प्रवाशाला जर ती पाकिस्तानात असती तर त्याने तिचे अपहरण केले असते असे बोलतांना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कॅनडातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ड्रायव्हर महिला प्रवाशाला जर ती पाकिस्तानात असती तर त्याने तिचे अपहरण केले असते असे बोलतांना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Canada Viral Video : कॅनडामध्ये चालक आणि महिला प्रवासी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांमधील हे संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कॅब ड्रायव्हर महिलेला सांगतो की जर ती पाकिस्तानात असती तर त्याने स्वतःच तिचे अपहरण केले असते. चालक हा मूळचा पाकिस्तानचा असल्याचे समजते.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर म्हणतो, तू जर पाकिस्तानात असती तर मी तुझे अपहरण केले असते. रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ टोरंटोचा आहे. व्हिडिओमध्ये ड्रायव्हर आधी म्हणतो, जर तुझा जन्म पाकिस्तानात झाला असता तर मी तुझे अपहरण केले असते. यावर आश्चर्य व्यक्त करत महिला म्हणते, तुम्ही माझे अपहरण केले असते का? यावर ड्रायव्हर उत्तर देतो, अर्थातच, कारण माझ्याकडे तुला मिळवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

हा व्हिडिओ १४ मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता. उबरने या कॅब चालकावर कारवाई करून त्याला निलंबित करावे, असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त भावना देखील व्यक्त केल्या आहेत. या ड्रायव्हरला पकडून पाकिस्तानात पाठवले जावे, असे अनेकांनी या व्हिडिओवर कमेन्ट करतांना म्हटले आहे.

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

एका युजरने ड्रायव्हरला सपोर्ट करत म्हटले की, ड्रायव्हर पूर्ण काय बोलला हे माहित नाही. त्याचा छोटा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कदाचित तो गमतीने काहीतरी बोलत असावा. अनेक निरुपयोगी गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच प्रकरण काय आहे हे समजेल.

पाक व्याप्त काश्मीरमध्ये महागाईवर हिंसाचार

पाकिस्तानमध्ये महागाईच्या मुद्द्यावरून पाक व्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. पाकिस्तान सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रस्तावर नागरिक उतरले आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात मोठी झाडपट होत असून खोऱ्यात संचारबंदी लागू केली आहे. जमावाला पंगवण्यासाठी आलेल्या पोलिसांना नागरिकांनी हकलुन लावले आहे. तसेच त्यांना चांगला मार देखील दिला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग