Viral Video : नोकरी मिळाली नाही तर बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही…; नोकरीसाठी केलेला अनोखा अर्ज व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : नोकरी मिळाली नाही तर बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही…; नोकरीसाठी केलेला अनोखा अर्ज व्हायरल

Viral Video : नोकरी मिळाली नाही तर बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही…; नोकरीसाठी केलेला अनोखा अर्ज व्हायरल

Jun 16, 2024 05:24 PM IST

Viral Video : जॉब मीवळण्यासाठी कुणी काहीही करू शकतं. एकाने जॉब मिळावा म्हणून भन्नाट जॉब अ‍ॅप्लिकेशन लिहिलं आहे. हे अ‍ॅप्लिकेशन कंपनीच्या सीईओने शेअर केलं असून सध्या ते सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

'नोकरी मिळाली नाही, तर लहानपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही'; अनोखं जॉब अ‍ॅप्लिकेशन व्हायरल
'नोकरी मिळाली नाही, तर लहानपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही'; अनोखं जॉब अ‍ॅप्लिकेशन व्हायरल

Viral Video : बेंगळुरूच्या एका कंपनीच्या सीईओचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्वा हेल्थच्या संस्थापक व सीईओ दीपाली बजाज यांनी नुकतीच त्यांच्या स्टार्टअपमधील रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. या नोकरीसाठी अनेक अर्ज आले पण त्यातील एक अर्ज असा होता की, हा अर्ज शेअर केल्याशिवाय त्या राहू शकल्या नाहीत. जॉब साठी अर्ज केलेल्या एकाने त्याच्या लव्ह लाईफचा उल्लेख केला असून त्याने जे काही या अ‍ॅप्लिकेशनमध्ये लिहिले आहे ते भन्नाट आहे. तुम्ही हे वाचल्यावर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. या अर्जात नेमके काय लिहिले हे जाणून घेण्यापूर्वी संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात .

दीपाली बजाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या कंपनीत नोकरीसाठी एकाने केलेला अर्ज शेअर केला आहे. या अर्जाचा स्क्रीनशॉट त्यांनी एक्सवर ट्विट केला आहे. नोकरी मिळावी यासाठी अर्जदाराने अर्जात लिहिले होते की, त्याला या नोकरीची खूप गरज आहे. कारण त्याला त्याच्या बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करायचे आहे. त्याने अर्जात लिहिले की, "माझ्या बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मला ही नोकरी हवी आहे.'' त्याने पुढे लिहिले आहे की, जर त्याला ही नोकरी मिळाली नाही तर त्याच्या प्रेयसीचे वडील त्याला मुलीशी लग्न करू देणार नाहीत. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, लग्नाआधी नोकरी लागायला हवी, जर असे झाले नाही तर ते त्यांच्या मुलीशी त्याचे कधीही लग्न होऊ देणार नाहीत.

दरम्यान, अर्जात एक कॉलम होता ज्यामध्ये या पदासाठी तुम्ही योग्य का आहात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अर्ज करणाऱ्या व्यक्तीने उत्तर देतांना लिहिले की, "मला विश्वास आहे की मी या पदासाठी पात्र आहे. तसेच या साठी लागणारे सर्व कौशल्य माझ्यात असून या पदाला मी न्याय देऊ शकेल. याशिवाय, जर मला ही नोकरी मिळाली नाही, तर मी माझ्या बालपणीच्या प्रेयसीशी कधीही लग्न करू शकणार नाही. कारण तिच्या वडिलांनी अट घातली आहे की जेव्हा मला नोकरी असेल तेव्हाच तिच्याशी ते लग्न लावून देतील.''

दीपिका बजाज यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या ऍप्लिकेशनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे. दीपिका यांनी एक्सवर उमेदवाराचा प्रतिसाद देखील शेअर केला आणि लिहिले, "नोकरी देणे देखील मजेदार असू शकते."

या पोस्टवर खूप मनोरंजक कमेन्ट आल्या आहेत. अनेकांनी बजाज यांना अर्जदाराच्या प्रामाणिकपणासाठी त्याला नोकरी देण्यास सांगितले आहे. एकाने लिहिले आहे की, "तरुणाचा अर्ज आमच्या हृदयाला स्पर्श करून गेला आहे. त्याच्या प्रामाणिकपणासाठी त्याला कामावर घ्या. एका व्यक्तीने लिहिले की, त्याला नोकरी द्या. तर एकाने म्हंटले आहे की जॉब मिळवण्यासाठी ही पद्धत खरच उपयोगी आहे का ?

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर