मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind kejriwal : ‘पतीने मोदींचा जयघोष केला तर रात्रीचे जेवण देऊ नका’: केजरीवालांचे महिला मतदारांना अजब आवाहन

Arvind kejriwal : ‘पतीने मोदींचा जयघोष केला तर रात्रीचे जेवण देऊ नका’: केजरीवालांचे महिला मतदारांना अजब आवाहन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 10, 2024 02:28 PM IST

Arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind kejriwal) यांनी महिलांना अजब आवाहन केले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी शपथ देऊन 'आप'ला पाठिंबा देण्याचे सांगितले आहे.

‘पतीने मोदींचा जयघोष केला तर रात्रीचे जेवण देऊ नका’: केजरीवालांचे महिला मतदारांना अजब आवाहन
‘पतीने मोदींचा जयघोष केला तर रात्रीचे जेवण देऊ नका’: केजरीवालांचे महिला मतदारांना अजब आवाहन (PTI)

Arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी महिलांना अजब आवाहन केले आहे. पतीने जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा ‘जप’ केल्यास त्यांना जेवण देऊ नका, असे केजरीवाल म्हणाले. त्यांच्या या अजब गजब आवाहनाची सध्या चर्चा रंगली आहे.

अरविन्द केजरीवाल म्हणाले, "अनेक पुरुष पंतप्रधान मोदींच्या नावाचा जप करतात. परंतु तुम्हाला त्यांना वठणीवर आणावे लागेल. जर तुमच्या पतीने मोदींचे नाव घेतले तर त्यांना सांगा की तुम्ही त्यांना जेवण देणार नाही," केजरीवाल हे दिल्लीतील टाऊनहॉल येथे आयोजित 'महिला सन्मान समारोह कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

Bhaskar Jadhav Crying : मुलाचं मनोगत ऐकून भर मंचावर भास्कर जाधव झाले भावुक, आज करणार भूमिका स्पष्ट

अरविंद केजरीवाल यांनी महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शपथ घेऊन त्यांना आणि 'आप'ला पाठिंबा देणीयचे सांगितले. महिलांना भाजपला पाठिंबा देणाऱ्या इतर महिलांना सांगण्यास सांगितले की "फक्त तुमचा भाऊ केजरीवाल तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मला पाठिंबा देऊन बळ द्या. तुमच्या घरच्यांना सांगा की मी त्यांना वीज मोफत दिली आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवा देखील मोफत केली आहे. आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. भाजपने तुमच्यासाठी काय केले आहे? मग भाजपला मत का द्यावे? यावेळी फक्त आपला मत द्या, " असे केजरीवाल म्हणाले.

Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी देखील मुंबईतील उमेदवाराची घोषणा, संजय निरुपम आक्रमक

केजरीवाल म्हणाले, महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली आतापर्यंत तुमची फसवणूक करण्यात आली आहे. "पक्ष एखाद्या महिलेला काही पद देतात आणि म्हणतात की महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. महिलांना पदे मिळू नयेत या साठी प्रयत्न केला जात आहे.

आप सरकारची 'मुख्यमंत्री महिला सन्मान ही नवी योजना' - खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणार आहे. महिलांच्या हातात जेव्हा पैसा असेल तेव्हा त्यांचे सशक्तीकरण होईल. प्रत्येक महिलेला आता दरमहा १००० रुपये मिळणार आहे. यामुळे त्यांना फायदा होणार आहे. ही योजना संपूर्ण जगात "सर्वात मोठा महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल असे देखील केजरीवाल म्हणाले.

WhatsApp channel