आपण सगळ्यांनी किती वेळा इडली खाल्ली असेल माहीत नाही. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इडली माणूस भूक असो वा नसो केव्हाही खाऊ शकतो. दक्षिण भारतात इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट फूड मानले जाते, पण आता इडलीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, काही रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सरदेखील होऊ शकतो. यामुळे केवळ बेंगळुरूच नव्हे, तर देशभरातील नागरिक सतर्क झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरूच्या आरोग्य विभागाने तपासणी केली आहे, ज्यामध्ये काही हॉटेल्स, फेरीवाल्यांनी बनवलेली इडली प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फेरीवाले आणि हॉटेलचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत तपासणी आणि चाचणी केल्यानंतर अनेक नमुन्यांमध्ये कार्सिनोजेनिक रसायने आढळून आल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी हॉटेल आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमधून सुमारे ५०० नमुने गोळा केले. प्रयोगशाळेतील तपासणीत असे दिसून आले की यापैकी ३५ नमुन्यांमध्ये कार्सिनोजेनिक रसायने आढळली जी लोकांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. अधिकारी अजूनही शेकडो नमुन्यांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. याचे कारण जाणून घेण्यासाठी अधिकारी हॉटेल आणि फेरीवाल्यांकडे गेले असता पूर्वी इडलीचे पीठ सूती कापडावर ठेवले जात होते, जे वाफेत शिजवण्यापूर्वी इडली ट्रेवर ठेवले जात होते. पण आता हॉटेल्समध्ये सुती कापडाऐवजी प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला आहे.
त्यामुळे उन्हाळ्यात हे प्लास्टिक रसायने सोडते, त्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, सरकार स्वयंपाकात प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार करत आहे.
संबंधित बातम्या