IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Nov 11, 2024 07:32 PM IST

IDBI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंध आहे. आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती
आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती

IDBI ESO Recruitment 2024: आयडीबीआय बँकेने एक्झिक्युटिव्ह - सेल्स अँड ऑपरेशन्स म्हणजेच ईएसओ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आयडीबीआय बँकेची अधिकृत वेबसाइट idbibank.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती मोहिमेंतर्गत संस्थेतील १००० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ७ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांची अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन परीक्षेची संभाव्य तारीख १ डिसेंबर २०२४ आहे. या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.

रिक्त जागेचा तपशील

  • यूआर: ४४८ पद
  • एसटी : ९४ पदे
  • एससी: १२७ पद
  • ओबीसी : २३१ पदे
  • ईडब्ल्यूएस : १०० पदे
  • पीडब्ल्यूबीडी : ४० पदे

पात्रता निकष

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे एआयसीटीई, यूजीसी इ. सरकारी/ शासकीय संस्थांकडून मान्यताप्राप्त/ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

वय

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षे दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर १९९९ पूर्वी आणि १ ऑक्टोबर २००४ नंतर (दोन्ही तारखांचा समावेश) झालेला असावा.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी (ओटी), कागदपत्र पडताळणी (डीव्ही), वैयक्तिक मुलाखत (पीआय) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (पीआरएमटी) यांचा समावेश आहे. ऑनलाइन परीक्षेत लॉजिकल रिझनिंग, डेटा अ‍ॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि जनरल/इकॉनॉमी/बँकिंग अवेअरनेस/कॉम्प्युटर/आयटी या विषयांचे प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीचे उत्तर दिल्यास त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश किंवा ०.२५ गुण वजा केले जातील.

अर्ज शुल्क

अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५०/- रुपये (केवळ सूचना शुल्क) आणि इतर सर्व उमेदवारांसाठी १०५०/- रुपये (अर्ज शुल्क व सूचना शुल्क) आहे. डेबिट कार्ड (रुपे / व्हिसा / मास्टरकार्ड / मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर