मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ICSI CSEET 2024 Result: आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी लागणार रिझल्ट

ICSI CSEET 2024 Result: आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी लागणार रिझल्ट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 18, 2024 05:38 AM IST

ICSI CSEET 2024 Result Date: आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेचा निकाल संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ICSI announces CSEET 2024 result date
ICSI announces CSEET 2024 result date (Getty Images/iStockphoto)

ICSI CSEET Exam Result: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रेंस टेस्ट म्हणजेच सीएसईईटी परीक्षा २०२४ च्या निकालाची तारीख जाहीर केली.  या परीक्षेचा निकाल येत्या शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता जाहीर केला. आयसीएसआय सीएसईईटी जानेवारी २०२४ मध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांना www.icsi.edu येथे अधिकृत वेबसाइटद्वारे निकाल पाहता येईल.

आयसीएसआयने ६ जानेवारी २०२४ आणि ०८ जानेवारी २०२४ रोजी सीएसईईटी परीक्षा आयोजित केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी निकालाटी एक कॉपी स्वत:जवळ ठेवावी. कारण, उमेदवारांना निकाल-सह-गुण स्टेटमेंटची कोणतीही प्रत जारी केली जाणार नाही, असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे.

निकाल कसा पाहायचा?

 

  • www.icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुखपृष्ठावर, आयसीएसआय सीएसईईटी जानेवारी 2024 निकाल दुव्यावर क्लिक करा
  •  त्यानंतर लॉग इन करा
  • पुढे आयसीएसआय सीएसईईटी जानेवारी 2024 निकाल पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवारांना आपला निकाल दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

अधिक माहिती साठी उमेदवारांनी आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

WhatsApp channel

विभाग