CISCI Result Out: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org तपासू शकतात. निकाल जाहीर झाल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ इमॅन्युएल यांनी अधिकृत वेबसाइटवर दिली. परिषदेने २१ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान गुजरातमध्ये आयएससी दहावीची परीक्षा घेतली होती. तर, बारावीच्या परीक्षा १२ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
या परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल cisce.org किंवा results.cisce.org या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. सीआयएससीई परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक होते. गेल्या वर्षी सीआयएससीई दहावीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.९४ टक्के होती. त्यापैकी ९९.२१ टक्के मुली आणि ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तर, बारावीचा निकाल ९६.९३ टक्के आहे. त्यापैकी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. तर, मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.
यावर्षी २ हजार ६९५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आयसीएसई परीक्षा दिली. यापैकी २ हजार २२३ शाळांनी १०० टक्के गुण मिळवले. तर, १ हजार ३६६ शाळांमधील मुलांनी आयएससी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ९०४ शाळांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
यंदा आयसीएसईमध्ये मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली. यंदा एकूण ९९.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६५ टक्के आहे. त्याचप्रमाणे आयएससी बारावीमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.९२ टक्के आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे.
यंदा एकूण ९९.४७ टक्के विद्यार्थी आयसीएसई दहावी उत्तीर्ण झाले आहेत. ही संख्या २.४२ लाख आहे. तर, एससी बारावीचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१९ टक्के आहे. ही संख्या ९८.८८ टक्के आहे.
सीआयएससीई बोर्डाने घेतलेल्या आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीच्या परीक्षेत एकूण ३ लाख ४३ हजार ५१८ विद्यार्थी बसले होते. यातील एकूण २ लाख ६१७ विद्यार्थी आयसीएसई परीक्षेत बसले होते, ज्यात १ लाख ३० हजार ५०६ मुले आणि १ लाख १३ हजार १११ मुलींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या