Government Job 2024: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरमध्ये सायंटिस्ट-बी आणि सायंटिस्ट-सी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार recruit.icmr.org.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. आयएमसीआरमध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
आयएमसीआरमध्ये एकूण ३१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात वैज्ञानिक-बीमध्ये १५ मेडिकल आणि १५ नॉन-मेडिकलच्या रिक्त जागेवर भरती होणार आहे. तर, वैज्ञानिक- सी पदासाठी ०१ जागा रिक्त आहे.
संगणक-आधारित लेखी परीक्षा (एमसीक्यू) किंवा मुलाखत किंवा दोन्हीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा घेतल्यास ती संशोधन पद्धतींच्या आकलनावर आधारित असेल आणि ती पात्र ठरेल आणि किमान पात्रता ७५ टक्के असेल. उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून १५०० रुपये अर्ज शुल्क आकारले जात आहे. तर, एससी, एसटी, महिला, बीडब्लूबीडी, इडब्लूएस यांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.