मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ICICI Bank होमलोन महागले; ग्राहकांना भूर्दंड

ICICI Bank होमलोन महागले; ग्राहकांना भूर्दंड

HT Marathi Desk HT Marathi
Jun 09, 2022 12:29 PM IST

आयसीआयसीआय बँकेने आज होम लोनच्या व्याजदरात वाढ करत असल्याचे जाहीर केले आहे.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची नुकतीच वाढ केली. परिणामी आता विविध बँकांनी होम लोनच्या व्याजदरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. देशातील अग्रणी खासगी बँक असलेल्या ICICI Bank ने आज होम लोनच्या व्याजदरात वाढ करत असल्याचे जाहीर केले. कर्जाच्या व्याजदरात धडाधड वाढ करताना दिसत आहेत. (ICICI Bank hiked external benchmark lending rate)

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्णयानंतर आयसीआयसीआय बँकेने ८ जूनपासून बँकेच्या ईबीएलआर दराची (External Benchmark Lending Rate) पुनर्रचना केली आहे. बँकेच्या निर्णयामुळे थेट गृहकर्जाच्या मासिक हप्त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना आर्थिक भूर्दंड बसणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या पतधोरण निर्धारण समितीच्या बैठकीत व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. महागाई दर वाढल्यामुळे ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिझव्‍‌र्ह बँकेकडून महिनाभराच्या अवधीत झालेल्या सलग दुसऱ्या आणि एकूण ९० आधार बिंदूंच्या दरवाढीमुळे बँकांकडून वितरित कर्जे आणखी महागली आहेत. चलनवाढीमुळे प्रमुख जिन्नसांच्या किंमत वाढीसह घर, वाहनासाठी कर्जाचे मासिक हप्ते महागणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग