उत्तरांचल विद्यापीठातील एका कार्यक्रमाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी डान्स करताना दिसत आहेत. पण डान्स करताना मध्येच असे काही घडते की सगळेजण हसायला लागतात आणि मुलगा मुलीचा हात सोडून निघून जातो. या कार्यक्रमाला “आईस-ब्रेकिंग” असे नाव देण्यात आले आहे.
हा मजेशीर व्हिडीओ @_leo.sr._ नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी एकत्र नाचताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणारे विद्यार्थी आहेत.
अशा स्थितीत डान्स करताना दोघांचा आत्मविश्वास वाढतो. दोघेही कपल डान्समध्ये मग्न असतात. पण तेवढ्यात एक नवं गाणं सुरू सुरू होतंं हे गाणं सुरू होताच, डान्स करणाऱ्या जोडप्याला ४४० व्होल्टचा झटका लागते.
कारण ते दोघे रोमँटिक गाण्यावर डान्स करत असताना मधातच रक्षाबंधनाचं गाणं सुरू होतं. गाणं ऐकताच मुलगा त्या मुमुलीचा हात झटकतो आणि दूर जातो. यानंतर सगळेजण जोरजोरात हसायला लागतात.
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या कॅप्शनुसार, मुलगा एक सीनियर विद्यार्थी आहे मुलगी त्याची ज्यूनियर आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ ३ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यन, कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी "आईस-ब्रेकिंग" कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाद्वारे ज्युनियर विद्यार्थ्यांची सिनीयर विद्यार्थ्यांशी ओळख करून दिली जाते. जेणेकरून भविष्यात दोघांमध्ये चांगले संबंध राहतील.