CA Inter and Final Results Out: चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) फायनल आणि इंटर परिक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार icai.nic.in/caresult या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक टाकावा लागणार आहे.
- सर्व प्रथम icai.nic.in वर जा.
- आवश्यकतेनुसार सीए इंटर किंवा अंतिम निकालाची लिंक उघडा.
- तुमचा रोल नंबर आणि अर्ज क्रमांकासह पेजवर लॉग इन करा.
- आता तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर असेल.
गट I मध्ये एकूण १ लाख १७ हजार ३०४ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यापैकी १९ हजार ६८६ उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १६.७८ इतकी आहे. तसेच गट II मध्ये ९३ हजार ६३८उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७ हजार ९५७ उमेदवारांनी बाजी मारली आहे. या निकालाची टक्केवारी १९.१८ इतकी आहे. दोन्ही गटात ५३ हजार ४५९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ५ हजार २०४ उतीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी ९.७३ इतकी आहे.
वाय गोकुळ साई श्रीकर (६८८/८०० गुण किंवा ८६ टक्के)
नूर सिंगला (६८२/८०० किंवा ८५.२५ टक्के)
कविता संदीप कोठारी (६७८/८०० किंवा ८४.७५ टक्के)
पोस्ट-क्वालिफिकेशन कोर्स डिप्लोमा ऑन मॅनेजमेंट अँड बिझनेस फायनान्स परीक्षा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाईल, असे आयसीएआयने जाहीर केले आहे.