Gujarat IAS Officer Wife Death Case : गुजरातमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीनं घराच्या दारासमोर विष प्राशन करून आत्महत्या केल्यानं खबळळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही काळापूर्वी या अधिकाऱ्याची ही पत्नी एका अट्टल गुंडासोबत पळून गेली होती. यानंतर ती एका मुलाच्या अपहरणात सहभागी असल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने ही महिला तिच्या अधिकारी असलेल्या पतीला भेटीसाठी आली होती. मात्र, त्याने तिला घरात घेण्यास नकार दिल्याने तिने घराच्या दरातच विष प्राशन करून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने गांधीनगर येथे पतीच्या घरासमोर दारात उभे असताना विष प्राशन केले. त्यानंतर तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सूर्या (वय ४५) असे या महिलेचे नाव असून ती मुळची तामिळनाडूची रहिवासी आहे. ती आयएएस अधिकारी रंजीत कुमार यांची पत्नी असून ती काही दिवसांपूर्वी एका गुंडासह पळून गेली होती.
गँगस्टरशी अफेअर असणाऱ्या गुजरातच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या सूर्या नामक पत्नीने घरासमोरच विष प्राशण करत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद-विवाद सुरु होते, ते एकत्रही राहत नव्हते. त्यानंतर ती अचानक घरी आली. जेव्हा तिला घरात घेण्यास नकार देण्यात आला तेव्हा तिने घरासमोरच विष प्राशन केले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सूर्या शनिवारी सकाळी पती रणजीत कुमार जे यांच्या घरी गेली. मात्र, संतापलेल्या रंजीत यांनी घरातील कर्मचाऱ्यांना तिला घरात येऊ देऊ नका असे सांगितले. रणजीत कुमार यांनी पत्नी सूर्यासोबत घटस्फोटासाठी देखील अर्ज केला होता. पत्नीला कोणत्याही परिस्थितीत घरात येऊ देऊ नका, असे त्याने कर्मचाऱ्यांना सांगितले होते. सूर्या त्याच्या घरी पोहोचली तेव्हा कर्मचाऱ्यांनी तिला आत येण्यास रोखले. सूर्याने खूप प्रयत्न केले पण तिला घरात जाऊ दिले नाही. यानंतर रागाच्या भरात सूर्याने घराच्या दारात विष प्राशन केले.
वृत्तानुसार, एका १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक टाळण्यासाठी सूर्या ही तिच्या पतीच्या घरी गेली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सूर्याचे नाव हे तिचा अट्टल गुन्हेगार असलेला गँगस्टर बॉयफ्रेंड 'हायकोर्ट महाराजा'सोबत अपहरण प्रकरणात पुढे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईसोबत पैशांवरून काही वाद झाल्यानंतर ११ जुलै रोजी ती मुलाला घेऊन गेली होती. या कामात त्यांचे सहकारी सेंथिल कुमार यांनीही दोघांना साथ दिली. दोघांनी अपहरण केलेल्या मुलीच्या आईकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र मदुरे पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. यानंतर पोलिसांनी सूर्यासह या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला. सुमारे ९ महिन्यांपूर्वी सूर्या ही पती रंजीत यांना सोडून गँगस्टर हायकोर्ट महाराजांसोबत पळून गेली होती.
संबंधित बातम्या