MiG 29 Crash : हवाई दलाचं मिग २९ लढाऊ विमान कोसळलं; खाली पडताच झाला मोठा स्फोट होऊन लागली भीषण आग; पाहा Video-iafs mig 29 fighter jet crashes near rajasthans barmer pilot safe ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MiG 29 Crash : हवाई दलाचं मिग २९ लढाऊ विमान कोसळलं; खाली पडताच झाला मोठा स्फोट होऊन लागली भीषण आग; पाहा Video

MiG 29 Crash : हवाई दलाचं मिग २९ लढाऊ विमान कोसळलं; खाली पडताच झाला मोठा स्फोट होऊन लागली भीषण आग; पाहा Video

Sep 03, 2024 07:41 AM IST

Fighter Plane MiG 29 Crashes in Barmer : राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातातून पायलट सुखरूप बचावला आहे. विमानात मोठा स्फोट झाला असून यानंतर आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

हवाई दलाचं मिग २९ लढाऊ विमान कोसळलं; खाली पडताच झाला मोठा स्फोट होऊन लागली भीषण आग; पाहा Video
हवाई दलाचं मिग २९ लढाऊ विमान कोसळलं; खाली पडताच झाला मोठा स्फोट होऊन लागली भीषण आग; पाहा Video (PTI/X)

Fighter Plane MiG 29 Crashes in Barmer : एका मोहिमेवर असलेल्या हवाई दलाचे मिग २९ विमान (Mig 29 Aircraft) क्रॅश झाले. सुदैवाने या आपघतातात वैमानिक बचवला आहे. ही घटना राजस्थानमधील बारमेरमध्ये मध्यरात्री घडली. तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान कोसळलं व विमानाला मोठा स्फोट होऊन आग लागली. लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झालयेण मोठी दुर्घटना टळली. बाडमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीना आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हवाई दलानं देखील याची माहिती दिली असून या बाबत चौकशी समिति स्थापन करण्यात आली आहे.

हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात पायलटला विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अपघातस्थळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

या अपघातानंतर भारतीय हवाई दलाकडून एक निवेदन जारी केले आहे. बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, भारतीय हवाई दलाचे मिग-२९ लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला, परिणामी पायलटने इजेक्शन सीटद्वारे विमानातून बाहेर पडला, यानंतर हे विमान मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी कोसळले, असे हवाई दलाने ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पायलट सुरक्षित असून जमिनीवर कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश हवाई दलाने दिले आहे.

बारमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र मीणा यांनी सांगितले की, रात्री बारमेरमध्ये मिग-२९ विमान कोसळले. लोकवस्तीपासून दूर ही घटना घडली. पायलट सुरक्षित आहे. घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. दुर्गम भागामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या अपघातस्थळी पोहोचू शकल्या नाहीत.

या वर्षी मार्चमध्ये एक तेजस विमान जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग कोसळले होते. अपघातापूर्वी पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले होते.

नाशिकमध्ये कोसळले होते सुखोई लढाऊ

तर ४ जून रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव गावाजवळ दुपारी १.२० वाजता हवाई दलाचे सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळले होते. अपघातानंतर विमानाला आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत पायलट आणि सहवैमानिक दोघेही सुखरूप बचावले. विमानाचे काही भाग ५०० मीटरच्या परिघात विखुरले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि हवाई दलाच्या सुरक्षा आणि तांत्रिक विभागाच्या पथकांनी अपघातस्थळी भेट देत पाहणी केली होती.

विभाग