iaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  iaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात

iaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात

Updated Mar 12, 2024 05:18 PM IST

Tejas aircraft crashes In Rajasthan: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेचे तेजस विमानाला अपघात झाल्याची घटना घडली.

Tejas aircraft meets with an accident in Rajasthan's Jaisalmer on Tuesday.
Tejas aircraft meets with an accident in Rajasthan's Jaisalmer on Tuesday. (HT Photo)

IAF Aircraft Crashes News: भारतीय वायुसेनेचे तेजस विमानाला आज (मंगळवार, १२ मार्च २०२४) अपघात घडला. हे विमान ऑपरेशनल ट्रेनिंग उड्डाणादरम्यान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोसळले. या अपघात कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे. अपघातापूर्वी वैमानिक सुखरूप बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी ची स्थापना करण्यात आली आहे, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. हलके लढाऊ विमान तेजस हे देशांतर्गत उत्पादित सुपरसोनिक विमान आहे. १९८४ मध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कार्यक्रमामुळे त्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची स्थापना झाली.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने या विमानाच्या डिझाइन आणि विकासाचे नेतृत्व केले. २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे अधिकृत नाव 'तेजस' म्हणजेच संस्कृतमध्ये 'तेज' असे ठेवले. एचएएलने विकसित केलेले हे दुसरे सुपरसोनिक लढाऊ विमान आहे.

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये भारतीय हवाई दलाच्या हॉक ट्रेनर विमानाला प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. कलाईकुंडा एअरफोर्स स्टेशनजवळील नागरी भागात हे विमान कोसळले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. दोन्ही वैमानिक सुखरूप बाहेर पडले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर