मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IAF Agniveer Result : वायुसेनेच्या अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

IAF Agniveer Result : वायुसेनेच्या अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 11, 2022 01:10 PM IST

Indian Air Force Agniveer Result 2022 : सशस्त्र दलाच्या बहुचर्चित अग्निवीर योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या वायु दलाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे.

IAF Agniveer Result
IAF Agniveer Result

दिल्ली: भारतीय संरक्षण दलांनी त्यांच्या भरती प्रक्रियेत बदल केले आहे. यावर्षी पासून अग्निवीर योजनेतून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सुरवातीला हवाई दलाची भरती प्रक्रिया जाहीर झाली होती. या नंतर नौदल आणि लष्कराने या भरती प्रक्रियेची घोषणा केली होती. वायु दलाने २४ जुलै २०२२ रोजी घतेलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत ७ लाख पेक्षा जात मुलांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल लागला असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची नावे संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

हवाई दलाने पहिल्या टप्प्यातील परीक्षा २४ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान हवाई दलाकडून घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना आता दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १ डिसेंबरला होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण ३ हजार ५०० पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २४ जून पासून सुरू झाली आणि ५ जुलै 2022 पर्यंत चालू होती.

हवाई दलाने जाहीर केलेल्या निकाल agnipathvayu.cdac.in या अधिकृत साइटवर जाहीर करण्यात आला आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करावे. होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे. याठिकाणी ओपन झालेल्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती प्रविष्ट करून ती सबमिट करावी. वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनवर त्यांचा निकाल दिसून येईल.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची कमाल शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराच्या वयाबद्दल बोलताना उमेदवाराचा जन्म २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ दरम्यान झालेला असावा. अग्निवीर भरती परीक्षेत निवडलेल्या अर्जदारांना PSL फेरीसाठी बोलावले जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग