मला दूध आवडते मात्र पती सोबत बसून चहा पिण्यासाठी हट्ट करतो; त्रस्त पत्नी पोहोचली पोलीस ठाण्यात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मला दूध आवडते मात्र पती सोबत बसून चहा पिण्यासाठी हट्ट करतो; त्रस्त पत्नी पोहोचली पोलीस ठाण्यात

मला दूध आवडते मात्र पती सोबत बसून चहा पिण्यासाठी हट्ट करतो; त्रस्त पत्नी पोहोचली पोलीस ठाण्यात

Oct 06, 2024 09:37 PM IST

यूपीच्या आग्रामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे पती-पत्नीमध्ये दारूसाठी नव्हे तर चहासाठी भांडण झाले आहे. हे प्रकरण इतकं वाढलं की हे प्रकरण पोलीस ठाण्यार्यंत पोहोचलं.

चहा (संग्रहित छायाचित्र)
चहा (संग्रहित छायाचित्र) (shutterstock)

दारूच्या व्यसनावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने व प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेश राज्यातील आग्रामध्ये चक्क चहावरून नवरा-बायकोमध्ये भांडण झालं होतं. नवऱ्याला चहाची इतकी आवड होती की तो दिवसातून अनेकदा चहा बनवायचा. पण बायकोला चहा प्यायला अजिबात आवडत नसे. तिला दूध प्यायला आवडतं. 

पत्नीचा आरोप आहे की, ती चहा पीत नाही, पण तिचा नवरा दिवसभरात अनेकदा चहा पितो. लग्नानंतर काही दिवसांनी नवरा बायकोसोबत बसून चहा पिण्याचा हट्ट करू लागला. त्यावरून भांडण झाले. पत्नी दोन महिन्यांपासून माहेरी होती. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पती-पत्नीमधील भांडणाचे प्रकरण असल्याने पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले.

या दोघांना कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. समुपदेशन दरम्यान पत्नीने पोलिसांना सांगितले की, पती दिवसातून किमान दहा वेळा चहा पितो. चहा तिला बनवायला सांगतो, मात्र याबद्दल तिला काहीच आक्षेप नाही. चहा बनवण्याचा तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता.  मात्र पती एकत्र बसून चहा पिण्याचा आग्रह धरायचा. ती त्याला नकार द्यायची. यावरून दोघांच्यात वाद होत असे.

 पत्नीला  चहा आवडत नाही. तिला दूध आवडतं. या प्रकरणी पत्नीने पतीला चांगलंच सुनावलं.  कुटुंबातील सदस्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले. चहावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर महिला आपल्या माहेरच्या घरी जाऊन राहू लागली. 

समुपदेशन झाल्यानंतर  दोघांमध्ये तडजोड झाली. नवरा यापुढे बायकोसोबत चहा पिण्याचा हट्ट करणार नाही, असं ठरलं. तिने दूध प्यायले तर तो तिची खिल्ली उडवणार नाही. टोमणे मारणार नाही. दुसऱ्या एका घटनेत लग्नाच्या २२ वर्षांनंतरही मुलगा न झाल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पत्नी माहेरच्या घरी राहायला आली होती. या महिलेला चार मुली आहेत. पतीला मुलगा हवा आहे, असा आरोप आहे. मुलगा नसल्याने पती पत्नीचा छळ करत असल्याचा आरोप आहे.  पतीला समजावून सांगितले की, मुलापेक्षा मुली कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.  तो आपल्या पत्नीसोबत हिंसक वागणार नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर