Rahul Gandhi : नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नाही तर सहानुभूती!अमेरिकेत राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नाही तर सहानुभूती!अमेरिकेत राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नाही तर सहानुभूती!अमेरिकेत राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

Sep 10, 2024 10:33 AM IST

Rahul Gandhi on Narendra Modi : अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.

नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नाही तर सहानुभूती!अमेरिकेत राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नाही तर सहानुभूती!अमेरिकेत राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य (PTI)

Rahul Gandhi on Narendra Modi : अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला अनेकदा सहानुभूती वाटते. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल, पण मी मोदींचा द्वेष करत नाही. मी सकाळी उठतो आणि विचार करतो की त्यांची मते वेगळी आहेत तर माझी मते काहीशी वेगळी आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही, परंतु मी त्याचा तिरस्कार करत नाही. मला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढतीचं कोणतही कारण दिसत नाही. मी त्याला माझा शत्रू देखील मानत नाही.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले, मी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पद यात्रेदरम्यान, चाललो. या प्रवासात माझ्या मनात होते की मी २००४ पासून राजकारणात आहे. पण नेता म्हणून मी प्रेम या शब्दाचा वापरला कया नाही केला ? राजकारणात आपण राग आणि द्वेष करत असतो पण, त्याहून चांगली गोष्ट म्हणजे प्रेम. मला या प्रेमाचा राजकारणात वापर करावासा वाटला. प्रेम हे किती प्रभावी व शक्तिशाली मध्यम आहे हे तुम्ही समजू शकता. प्रेम ही प्रत्येकाला जाणवणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबावर, देशावर प्रेम असते. मग राजकारणात हे का होऊ शकत नाही? धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्याऐवजी महात्मा गांधींचीही विचारधारा देशात होती. ही विचारसरणी सांगते की आपण राग, द्वेष आणि हिंसा स्वीकारायला तयार नाही.

अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी अमेरिकेत भाजप व मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर  भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भाषण करून भारतीय लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी  केला आहे.  राहुल गांधी हे अपरिपक्व नेते आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण ते (लोकसभेत) विरोधी पक्षनेते झाल्यापासून जनतेने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. याची जाण त्यांना असावी. राहुल गांधी हे भारतीय लोकशाहीतील काळा डाग आहेत, हे सांगताना मला दु:ख होत आहे. परदेश दौऱ्यावर गेल्यावर काय बोलावे हेही त्यांना कळत नाही, असे भाटिया यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर