मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोनदा पंतप्रधान होणं पुरेसं नाही, मी वेगळ्या धातूचा बनलोय - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (हिंदुस्तान टाइम्स)

दोनदा पंतप्रधान होणं पुरेसं नाही, मी वेगळ्या धातूचा बनलोय - नरेंद्र मोदी

14 May 2022, 15:14 ISTDilip Ramchandra Vaze

नरेंद्र मोदी यांनी गुजरात इथल्या एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे उपस्थिती लावली होती. त्यावेळेस त्यांनी आपण दोनदा पंतप्रधान झाल्यानंतर थांबणार नसल्याचं सांगितलं.

मी एका वेगळ्या धातूचा बनलो आहे. मला भलेही दोनदा पंतप्रधानपद भूषवता आलं आहे. मात्र यानंतरही मी थांबणार नाही. मला अजूनही लोकांसाठी खूप काही करायचं आहे. लोकांच्या भल्यासाठी अनेक योजना अजूनही माझ्या डोक्यात आहेत.अनेकांना असं वाटत असेल की दोनवेळा पंतप्रधान झाल्यावर मी थांबेन तर त्यांनी तो विचार डोक्यातनं काढून टाकावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. ते गुजरात सरकारच्या विविध योजनांमधल्या लाभार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे संबोधित करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

ते म्हणाले एक दिवस देशातले एक मोठे नेते माझ्या भेटीला आले. ते नेहमी माझ्या धोरणांवरुन माझ्यावर टीका करतात.मात्र मी त्यांचा सन्मान करतो.काही राजकीय बाबतीत त्यांचे माझे मतभेद आहेत. माझी भेट घेतल्यावर त्यानी मला विचारलं की, तुम्ही दोनदा देशाचे पंतप्रधान झालात, आता तुम्हाला आणखी काय हवंय असं विचारलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जो देशाचा दोनवेळा पंतप्रधान होतो तो सर्व भरुन पावतो अशी त्यांची समजूत होती. मात्र त्यांना माहित नाही मोदी कोणत्या मातीचा बनला आहे. ही गुजरातची माती आहे. मला कोणत्याही परिस्थिती कमी पडून चालणार नाही.मी त्यावर विश्वासही ठेवत नाही. जे करायचं होतं ते केलं आता थोडा आराम कारयला हवा असा विचार करणाऱ्यांपैकी मी नाही. सरकारच्या अनेक योजना अजूनही मला लोकांपर्यंत न्यायच्या आहेत असं आपण म्हणाल्याचं मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाच्यावेळेस कोणत्याही राजकीय नेत्यांचं नाव घेतलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मोदींना भेटायला आलेल्या त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये दोन नावं महत्वाची आहेत. एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत.

शरद पवारांनी केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात करत असलेल्या कारवायांवर नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधलं होतं तर संजय राऊत यांनी आपल्या परिवाराला निशाणा बनवलं जात असल्याच्या कारणावरुन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती