मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hyundai Creta : ह्युंदाईने बाजारात आणली नवी कार! नवा लुक, दमदार इंजिन व आकर्षक फीचरमुळे बाजरात घालणार धुमाकूळ

Hyundai Creta : ह्युंदाईने बाजारात आणली नवी कार! नवा लुक, दमदार इंजिन व आकर्षक फीचरमुळे बाजरात घालणार धुमाकूळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 10, 2024 02:21 PM IST

Hyundai 2024 Creta ह्युंदाईने बाजारात नवी कार आणली आहे. या गाडीचा फोटो कंपनीने जाहीर केला आहे. गाडीला नवा लुक आणि आकर्षक फीचर देण्यात आले असून ही गाडी बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.

Hyundai 2024 Creta
Hyundai 2024 Creta

Hyundai 2024 Creta : ह्युंदाई बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहे. ह्युंदाईने भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांची गरज ओळखून फेसलिफ्ट ही नवी गाडी बाजारात आणली आहे. या गाडीचा लुक कंपनीने जाहीर केला आहे. या गाडीचा लुक, फीचर, शक्तिशाली टर्बो-पेट्रोल इंजिन आणि किंमत देखील आकर्षक आहे. सर्वसमावेशक असलेली ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.

थंडीपासून वाचण्यासाठी घरात शेगडी पेटवली; कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

ह्युंदाईने क्रेटाच्या नव्या गाडीच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानात अनेक आमूलाग्र बदल केले आहे. या गाडीत जागतिक दर्जाचे बदल कंपनीने केले आहेत. या गाडीत एलईडी डीआरएल आणि टेल लाईट्स देण्यात आले आहेत. गाडीला मजबूत लुक देण्यासाठी आकर्षक बंपरवर हेवी क्लेडिंग देखील देण्यात आले आहे.

Sanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी सांगितलं!

ह्युंदाईने ही नवी गाडी खास भारतीय ग्राहकांसाठी तयार केली आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या गाडीत आमूलाग्र बदल करण्यात आले आहे. या गाडीत पॉवरट्रेन, १६०PS १.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन, ७ स्पीड डीसीटी ट्रान्समिशन यंत्रणा देखील देण्यात आली आहे. हे दणकट इंजिन टॉप-एंड एसएक्स (O) व्हेरियंटसाठी खास आहे. ही गाडी सात प्रकारामध्ये बाजारात उपलब्ध आहे. यात ई, ईएक्स, एस, एसओ, एस एक्स, एसएक्स टेक आणि एसओ एक्स ओ या प्रकारात उपलब्ध आहे. भारतातील ग्राहकाच्या विविध गरजा ओळखून ही गाडी तयार करण्यात आली आहे. या गाडीत स्टँडआउट वैशिष्ट्यांसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) यांचा समावेश आहे, ज्यामुळे ही गाडी आरामदाई आणि सुरक्षित प्रवासाठी ओळखली जाणार आहे. ही गाडी १०.८७ लाख (एक्स-शोरूम) पासून बाजारात उपलब्ध आहे. २०२४ क्रेटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही कीया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटरा तसेच इतरा प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणार आहे.

ही आहेत वैशिष्टे

१.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन,

पॉवर: १६०PS,

टॉर्क: २५३Nm

ट्रान्समिशन: 7-स्पीड डीसीटी

पॉवर: ११५ PS

टॉर्क: १४४Nm

ट्रान्समिशन: ६-स्पीड MT/CVT

१.५ लिटर डिझेल इंजिन

पॉवर: ११६PS

टॉर्क: २५०Nm

ट्रान्समिशन: ६ स्पीड एमटी / ६-स्पीड एटी

आकर्षक डिझाइन, अपग्रेडेड पॉवरट्रेन आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह, क्रेटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात १६ जानेवारी रोजी लॉन्च केली जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग