Google Map : दिशा विचारली असता, गुगल मॅपने केली 'फसवणूक', महागडी एसयूव्ही कार कोसळली नदीत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google Map : दिशा विचारली असता, गुगल मॅपने केली 'फसवणूक', महागडी एसयूव्ही कार कोसळली नदीत

Google Map : दिशा विचारली असता, गुगल मॅपने केली 'फसवणूक', महागडी एसयूव्ही कार कोसळली नदीत

May 26, 2024 01:36 PM IST

Google Map viral news: दिशा आणि ठिकाण माहिती नसले की आपण गूगल मॅपचा आधार घेत असतो. मात्र, कधी कधी गूगल मॅप वापरणे अंगलट आल्याच्या घटना देखील घडल्या आहे. अशीच एक घटना केरळ येथे उघडकीस आली आहे.

दिशा आणि ठिकाण माहिती नसले की आपण गूगल मॅपचा आधार घेत असतो. मात्र, कधी कधी गूगल मॅप वापरणे अंगलट आल्याच्या घटना देखील घडल्या आहे. अशीच एक घटना केरळ येथे उघडकीस आली आहे.
दिशा आणि ठिकाण माहिती नसले की आपण गूगल मॅपचा आधार घेत असतो. मात्र, कधी कधी गूगल मॅप वापरणे अंगलट आल्याच्या घटना देखील घडल्या आहे. अशीच एक घटना केरळ येथे उघडकीस आली आहे.

Google Map viral news: दिशा आणि ठिकाण माहिती नसले की आपण गूगल मॅपचा आधार घेत असतो. अनोळखी आणि निर्जन रस्त्यावर गुगल मॅप खूप उपयुक्त ठरत असते. मात्र, हैदराबादमधील काही पर्यटकांना गूगल मॅपने दाखवलेला रस्ता हा चांगलाच अंगलट आणि महागात पडला आहे. गूगल मॅप दाखवत असलेला रस्ता फॉलो करतांना या पर्यंतकांची एसयूव्ही ही थेट नदीत कोसळली. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. या कारमध्ये तीन पुरुष आणि एक महिला प्रवास करत होते. ते अलप्पुझा येथे जात होते.

Pune News:पुणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब! मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आरोग्य मंत्र्याची तक्रार; म्हणाले..

सुदैवाने या घटनेत पर्यटकांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलीस कर्मचारी व स्थानिक लोकांनी वेळीच त्यांना वाचवले. मात्र, कार नदीत पूर्णपणे बुडाली असून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार नदीत पडल्याची माहिती मिळताच जवळच गस्तीवर तैनात असलेले पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेत पर्यटकांना वाचवले.

Pune Porsche Accident: माझा बाप बिल्डर असता तर ? माझी आवडती कार; कल्याणी नगर येथे अपघातस्थळी रंगली अनोखी निबंध स्पर्धा

या वर्षाच्या सुरुवातीला गुगल मॅपच्या चुकीमुळे तामिळनाडूच्या गुडालूरमध्ये एक कार पायऱ्यांवर अडकली होती. काही मित्र हे कर्नाटकात परत जात असताना ही घटना घडली होती. त्यांना गुगल मॅपद्वारे क्वार्टरमधून पायऱ्यांकडे जाणारा मार्ग दाखवण्यात आला. मात्र, येथे कोणताही मार्ग नव्हता.

IPL 2024 Final Weather : आयपीएल फायनलदरम्यान पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर हा संघ होईल चॅम्पियन

गेल्या वर्षीही अशीच घटना घडली होती. गुगल मॅपने सुचविलेल्या मार्ग फॉलो करत असतांना नदीत पडून दोन डॉक्टरांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर केरळ पोलिसांनी पावसाळ्यात गूगल मॅपचा वापर करताना सावधगिरी बाळगण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

KKR vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल फायलनमध्ये हैदराबाद-केकेआर आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका

गूगलमॅप हे सोईचे असले तरी यावर पूर्ण पणे विसंबून राहणे चुकीचे आहे. गेल्या काही दिवसांपासून गूगलने दाखवलेले मार्ग हे चुकीचे ठरले आहे. यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही जण हे पाण्यात किंवा झुडपात अडकून पडले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर