मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'लग्नात आहेर आणू नका मात्र पंतप्रधान मोदींना मत द्या', नवरदेवाच्या वडिलांची अनोखी मागणी

'लग्नात आहेर आणू नका मात्र पंतप्रधान मोदींना मत द्या', नवरदेवाच्या वडिलांची अनोखी मागणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2024 01:53 PM IST

Viral News : एका व्यक्तीने मुलाच्या लग्नपत्रिकेच पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे. त्याचबरोबर त्यावर लिहिले की, नरेंद्र मोदी यांना तुमचे एक मत आमच्यासाठी अमूल्य भेट असेल.

लग्नपत्रिकेतून मोदींना मतदान करण्याचे आवाहन
लग्नपत्रिकेतून मोदींना मतदान करण्याचे आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रचारात गुंतले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे व नेत्यांचे समर्थकही यामध्ये आपले योगदान देत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जबरा फॅन हैदराबादमधून समोर आला आहे. संगारेड्डी जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तीने नुकतेच आपल्या मुलाचे लग्न केले. यामध्ये त्याने आपल्या पाहुण्यांना व मित्र-आप्तेष्टांना एक अनोखे आवाहन केले आहे. त्याने लोकांना म्हटले की, माझ्या मुलाच्या लग्नात आहेर आणले नसतील तर चालेल. मात्र त्याने एक वेगळीच मागणी केली आहे. या व्यक्तीने मुलाच्या लग्नपत्रिकेच पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे. त्याचबरोबर त्यावर लिहिले की, नरेंद्र मोदी यांना तुमचे एक मत आमच्यासाठी अमूल्य भेट असेल.

४ एप्रिल रोजी हा लग्न समारंभ आहे. नंदीकांती नर्सिम्लु आणि त्यांची पत्नी नंदीकांती निर्मला यांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचे नाव साई कुमार आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी या तरुणीशी होत आहे. त्यांच्या लग्नासाठी छापलेली लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. शहरातील लोक याबाबत चर्चा करत आहेत. निर्सम्लु लाकडापासून बनवलेल्या वस्तूचे पुरवठादार आहेत. त्यांना दोन मुली असून त्यांचे विवाह झाले आहेत. मात्र त्यांच्या लग्नात त्यांनी असे कोणते आवाहन केले नव्हते.


नवरदेवाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या घरातील सदस्यांनी ही आयडिया खूप आवडली. घरातील लोक म्हणले असे करायला हवे. त्यांनी सांगितले की, निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम सुरू आहे. जेव्हा लोकांची नजर या पत्रिकांवर पडते तेव्हा त्यांना काही वेळासाठी आश्चर्यचकीत होतात. सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत आहे. इंटरनेट यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक याला यूनिक आयडिया म्हणत आहेत.

IPL_Entry_Point