Viral Video: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श; तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद!-hyderabad man inappropriately touching woman video goes viral on social media ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श; तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद!

Viral Video: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श; तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद!

Sep 18, 2024 02:01 PM IST

Hyderabad Man Inappropriately Touching Woman: हैदराबादमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श
व्हायरल व्हिडिओ: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

Viral News: गर्दीचा फायदा उचलून एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. हैदराबाद पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. अशाप्रकारचे लज्जास्पद कृत्य करणाऱ्याला तुरुंगात जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही, असाही पोलिसांनी इशारा दिला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

हैदराबाद पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या समोरील महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हैदराबाद पोलिसांनी लिहिले आहे की, ‘रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर आमची टीम लक्ष ठेवून आहे. तुमच्या मनातील वाईट हेतू नष्ट करणे, हेच तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून वाचवू शकतात.’

पोलिसांमुळे तरुणाचे पितळ उघडे पडले

गर्दीचा फायदा घेत संबंधित व्यक्ती आपल्या समोर उभा असलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे त्याच्याकडे लक्ष नाही, असे त्याला वाटत आहे. मात्र, हा प्रकार पोलिसांच्या टीमच्या लक्षात येताच त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामुळे तरुणाचे पितळ उघडे पडले.

नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की,'अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. सिकंदराबाद भागात काही लोक आहेत, जे विशेषतः मुली आणि महिलांची छेड काढतात आणि महिलांवर टिप्पणी करतात. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ' बोवेनपल्ली परिसरातील स्वीट हार्ट हॉटेल परिसरात बुधवार, शुक्रवार आणि रविवारी खूप गर्दी वाढते, त्यावेळी असे प्रकार अनेकदा घडतात.' आणखी एका युजरने असे म्हटले आहे की, 'मेहदीपट्टणम बस स्टॉपवर महिलांसोबत गैरवर्तन केले जाते, त्याची दखल घ्यावी.' नागरिकांच्या तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी संबंधित घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबईतील चेंबूरमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  आरोपीने पीडिताला पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Whats_app_banner
विभाग