पहिली नोकरी मिळाल्याच्या आनंदात तरुणीने आपल्या बालपणीच्या मित्राला बोलावले व त्याला पार्टी दिली. दारूच्या नशेत धुंद मित्राने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीवरच बलात्कार केला. यामध्ये त्याचा मित्रही सहभागी होता. ही घटना हैदराबाद शहरातील वनस्थलीपुरम परिसरातील एका हॉटेलात घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. वनस्थलीपुरम एसीपी पी. कासिरेड्डी यांनी म्हटले की, आरोपींचा शोध घेतला जात आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांना पकडून चौकशी केली जाईल व कठोर कारवाई केली जाईल.
काय आहे प्रकरण?
वनस्थलीपुरम एसीपी पी. कासिरेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनस्थलीपुरमधील एका तरुणीला नुकतीच एका सॉफ्टवेयर कंपनीत नोकरी मिळाली आहे. तिने ही गोष्ट आपल्या बालपणीचा मित्र गौतम रेड्डी याला सांगितली. त्यानंतर तिने एक पार्टी दिली. ते दोघे सोमवार (२९ जुलै) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वनस्थलीपुरममधील ओंकार नगर येथे हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील एका हॉटेलात आले. तरुणीने आपला मित्र गौतम रेड्डी आणि अन्य एका मित्राला बोलावले होते. पोलिसांनी सांगितले की, तिघांनी बोम्मारिलु बार आणि रेस्टॉरंटमध्ये दारू प्यायली व नंतर हॉटेलमध्ये गेले.
तिघे जण रेस्टॉरंटच्या खालच्या मजल्यावरील हॉटेलमध्ये गेले. काही वेळानंतर जेव्हा तरुणीची नशा उतरली तेव्हा तिच्यासमोर गौतम रेड्डी व अन्य एक तरुण होता. दोघेही अर्धनग्न होते. त्यांना पाहून ती ओरडली व खोलीतून बाहेर पडली. जेव्हा तरुणीला समजले की, दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. तिने आपल्या मैत्रिणीला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर दोघींनी वनस्थलीपुरम पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तेलंगाणात आणखी एका बलात्काराची घटना घडली आहे. एका धावत्या बसमध्ये चालकाने एका विवाहित महिलेवर बलात्कार केला. महिलेचा आरोप केला की, बस चालकाने बलात्कार करण्यापूर्वी तिच्या तोंडात कपडा कोंबला होता. ही घटना ३० जुलै रोजी मेडचल परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. बस मेडचलजवळ गेल्यानंतर महिलेने १०० नंबर डायल करून पोलिसांना याची माहिती दिली. महिलेच्या फोननंतर पोलिसांनी बसचा शोध घेतला. उस्मानिया यूनिवर्सिटी पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी सांगितले की, एका खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाने बसच्या आतमध्ये महिला प्रवाशावर बलात्कार केला. महिला सुखरूप असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बसचा दुसरा चालक फरार आहे. तो मेट्टुगुडा परिसरात उतरला होता. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.