तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील पंजागुट्टा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ८६ वर्षीय एका उद्योगपतीची त्याच्या नातवानेच चाकू भोसकून हत्या केली आहे. सांगितले जात आहे की, संपत्तीच्या वादातून नातवाने आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केली. पोलिसांनी रविवारही या घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सह फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
कीर्ति तेजा (२८) असे आरोपीचे नाव असून व्ही. सी. जनार्दन राव असे मृत आजोबाचे नाव आहे. ते वेलजन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) होते. मालमत्तेच्या वादातून गुरुवारी (६ फेब्रुवारी) मध्यरात्री कीर्ती तेजाने आजोबा जनार्दन राव यांच्यावर चाकूने तब्बल ७३ वेळा वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आरोपीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिच्यावरही चाकूने वार केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. आरोपी अमेरिकेत मास्टर्सचे शिक्षण घेत होता. तिथून तो परतल्यानंतर तो आईसह जनार्दन राव यांना भेटायला गेला होता. मात्र, मालमत्तेच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला. शहराच्या दुसऱ्या भागात राहणारे तेजा आणि त्याची आई गुरुवारी सोमाजीगुडा येथे राहणाऱ्या राव यांच्या घरी गेले होते. तेजाची आई कॉफी बनण्यासाठी गेली असता तेजा आणि राव यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला.
संपत्तीच्या वाटणीत त्याला योग्य वाटा मिळाला नसल्याचा आरोप करत त्याने हल्ला केला. तेजा राव यांच्या मुलीचा मुलगा आहे. राव यांनी अलीकडेच त्यांच्या मोठ्या मुलीच्या मुलाला वेलजन ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्त केले हते. त्यांची मुलगी सरोजिनी देवी यांचा मुलगा तेज यांना ४ कोटी रुपयांचे शेअर्सचे वाटप करण्यात आले होते. मात्र आपल्यावर अन्याय्य वागणूक दिल्याचा आरोप करत त्याने चाकूने राव यांच्यावर ७३ वेळा सपासप वार केले. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
लहानपणापासूनच तेजाचे आजोबांबरोबर वागणे चांगले नव्हते. राव आपल्या मालमत्तेचे वाटप करण्यास नकार देत होते. आरोपीने अनेक वेळा चाकूने वार केले. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे चाकूच्या वारांची नेमकी संख्या समजली आहे. वेलजन कंपनच्या संकेतस्थळानुसार ही कंपनी १९६५ मध्ये स्थापन झाली असून जहाजबांधणी, ऊर्जा, मोबाईल आणि औद्योगिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
संबंधित बातम्या