jabalpur rape case : मॅट्रोमोनियल साईटवरून फसवणुकीच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. काही जण तरुणींना टार्गेट करून लग्न करण्याच्या आमिषाने त्यांच्या खात्यातून पैसे काढून अत्याचार केल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एका हिंदू मुलीशी लग्न करण्याच्या बहाण्याने मैत्री करून तिला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुलीने मुलगा हा हिंदू असल्याचे समजून तिने लग्न करण्याचे ठरवले. मात्र, या तरुणाने त्याचे खरे नाव मोहम्मद हुसेन लपवून राहुल ठेवल्याचं निष्पन्न झालं आहे.
एका लोकप्रिय मॅट्रोमोनियल साइटवर मोहम्मद हुसेनने राहुल या नावाने फेक प्रोफाईल तयार केले. यावेळी त्याने एका हिंदू मुलीशी जवळीक साधली. ३७ वर्षीय पीडित तरुणी जबलपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी आहे. पीडित मुलगी आणि राहुल (जो हुसेन असल्याचे निष्पन्न झाले) यांची दीड वर्षांपूर्वी मैत्री झाली. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी हुसेनने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये बोलावले होते. या ठिकाणी त्याने तरुणीवर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची दीड वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. दोघं बोलू लागले. काही दिवसांपूर्वी हुसेन याने पीडितेला एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. येथे दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. २२ सप्टेंबर रोजी आरोपीने पीडितेला आणखी एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
सीएसपी रितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मॅट्रोमोनिअल साइटला नोटीसही पाठवण्यात आली आहे. वेबसाइटवरून फेक प्रोफाइलबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. खरं तर राहुलच्या नावाने प्रोफाईल बनवणारी व्यक्ती प्रत्यक्षात हुसेन असल्याचे निष्पन्न झाले. अशा तऱ्हेने पडताळणी न करता इतक्या सहजपणे कोणी बनावट प्रोफाईल कसे तयार करू शकते, असा प्रश्नही साइटवर उपस्थित केला जात आहे.
मुलीच्या तक्रारीवरून लॉर्डगंज पोलिस स्टेशनने आरोपी मोहम्मद हुसेन ऊर्फ राहुल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कोतवालीचे सीएसपी रितेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून शारीरिक शोषण, एससी-एसटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
संबंधित बातम्या