Haridwar husband wife commit suicide: ‘मी कर्जाच्या दलदलीत असा काही फसलो आहे की, बाहेर पडू शकत नाही. मरण्यापूर्वी आम्ही आमचा फोटो सर्वांना शेअर करणार आहे..’या ओळी लिहिलेला व्यक्ती आता जगात नाही. मन सुन्न करणाऱ्या या घटनेत पती-पत्नीने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सेल्फी घेतली व त्यानंतर गंगा नदीत उडी मारली. गंगा नदीत जीव देण्यासाठी ते ८० किलोमीटर अंतर मोटारसायकलीवरून प्रवास करत हरिद्वारला पोहोचले होते. पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे.
आत्महत्या केलेले दाम्पत्य सहारनपूरमधील आहे. हा व्यक्ती सराफा व्यायसायिक होता. गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी तो पत्नीसह मोटारसायकलीवर शनिवार रात्री हरिद्वारला पोहोचला होता. तेथे गंगानदीवरील पुलावर दोघांना एकमेकांचा हात हातात घेतसेल्फी घेतली व गंगा नदीत झोकून दिले. पतीचा मृतदेह सापडला असून पत्नी बेपत्ता असून तिचा शोध घेतला जात आहे.
सुसाइड करण्याआधी दाम्पत्याने व्हॉट्सअपवर एक नोट पाठवला होती. त्यामध्ये लिहिले होते की, मी कर्जाच्या दलदलीत असा काही फसलो आहे की, बाहेर येता येत नाही. मरण्यापूर्वी आम्ही आमचे फोटो शेअर करत आहे. पोलीस तपासात समोर आले आहे की, या व्यावसायिकावर १० कोटी रुपयांचे कर्ज होते.
आत्महत्या केलेल्या पतीचे नाव सौरभ बब्बर (वय ३५) होत. ते कोतवाली क्षेत्रातील किशनपुरा येथे रहात होता. सौरभ घरातच श्री साईं ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. सौरभचा विवाह १५ वर्षापूर्वी मोना बब्बर हिच्याशी झाला होता. सौरभला दोन मुले आहेत. १२वर्षाची मुलगीश्रद्धा आणि १० वर्षाचा मुलगा संयम. सौरभचा मुलगा दिव्यांग आहे. ५ वर्षापूर्वी सौरभ व त्याचा लहान भाऊ विभक्त झाले होते. त्यानंतर सौरभ आपल्या आई-वडिलांपासून वेगळा रहात होता. लहान भाऊ आई-वडिलांसोबत गोविंदनगर येथे रहात होता.
सौरभ सोन्या-चांदीसोबतच कमेटीचे कामही करत होता. कमेटीत लोक आपला पैसा जमा करत होते व ब्याजासह परत करत होते. दरम्यान सौरभचा व्यापार ठप्प झाला होता व सौरभवर १० कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. लोक त्याच्याकडे पैशाचा तगादा लावत होता. सौरभने ही गोष्टी आपली पत्नी मोना हिला सांगितली होती. यामुळे दाम्पत्य त्रस्त होते.
सुसाइड करण्यापूर्वी सौरभने आपल्या दोन्ही मुलांना सासू-सासऱ्यांकडे सोडले होते. त्यांनी म्हटले होते की, महत्वाच्या कामासाठी ते जात आहेत. आल्यानंतर ते मुलांना घेऊन जातील. त्यानंतर ते बाईकवरून हरिद्वारला आले व तेथे गंगा नदीत उडी मारून जीव दिला.