मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भांडणाच्या नादात पती-पत्नी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडले खाली, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

भांडणाच्या नादात पती-पत्नी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडले खाली, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 29, 2023 07:33 PM IST

Viral Video : नवरा बायको भांडणाच्या नादात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडतात. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते पाहून कधी-कधी डोळ्यांवर विश्वास बसत नाहीत. कधी स्टंटबाजीचे असतात तर कधीअपघाताचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक जोडपे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडतानाया व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील.

या व्हिडीओमध्ये दिसते की, एक बहुमजली इमारतीच्या खाली कॉलनीतील रस्ता आहे. रस्त्यावरुन तीन तरुण जाताना दिसतात. त्याचवेळी रस्त्याकडेला असणाऱ्या इमारतीमधून एक महिला आणि पुरुष पडताना दिसते. तीन तरुणांच्या बरोबर समोरच हे जोडपे रस्त्यावर पडते. हे पाहून ते तरुण बाजुला होतात. मात्र नंतर नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी परिसरातील लोक जमा होतात.

Last Image या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत एक जोडपे भांडत होते व चुकून खाली पडले आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणांवर आदळले.

हे जोडपे पाचव्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये भांडण करत होते आणि भांडण्याच्या नादात बाल्कनीतून खाली पडतात. पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर या नवरा बायकोचा जीव वाचला की नाही, याविषयी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काही माहिती देण्यात आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग