Jammu and Kashmir High Court: भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार सार्वजनिक ठिकाणी पत्नीच्या कानशिलात लगावणे हा तिच्या प्रतिष्ठेचा अपमान होत नाही, असे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले आहे. संबंधित व्यक्तीने कौटुंबिक वादातून सार्वजनिक ठिकाणी पत्नीच्या कानशिलात लगावली होती. यामुळे त्याच्याविरोधात भादंवि कलम ३२३ आणि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या प्रक्रियेचा मुद्दा फेटाळून लावला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पत्नी कौटुंबिक न्यायालयात पोहोचली असता पतीने तिच्या कानशिलात लगावली. सार्वजनिक ठिकाणी पत्नीच्या कानशिलात लगावल्यामुळे पत्नीने पतीविरोधात भादंवि कलम ३२३ आणि ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. या विरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती रजनीश ओसवाल म्हणाले की, आयपीसीच्या कलम ३५४ नुसार हा गुन्हा ठरत नाही. जाणूनबुजून एखाद्याचे नुकसान करणे आयपीसीच्या कलम ३२३ नुसार गुन्हा होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तक्रारमध्ये नमूद केलेल्या गोष्टींनुसार, हा गुन्हा आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत येत नाही. कारण, प्रतिवादीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, जेव्हा ती कारवाईत सहभागी होण्यासाठी आली होती, तेव्हा तिला याचिकाकर्त्याने लोकांसमोर कानशिलात लगावली. महिलेच्या वतीने हजर झालेल्या वकिलाने हेही मान्य केले की, आयपीसीच्या कलम ३५४ नुसार हा गुन्हा घडत नाही. पण आयपीसीच्या कलम ३२३चा येथे विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या