Viral news : पती पत्नीचं नात्यात अनेक मुद्यावरून दुरावा निर्माण होत असतो. वैचारिक मतभेद, हुंडा, आर्थिक वाद अशा अनेक मुद्यावरून हे वाद होत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील यूपीच्या आग्रा येथे पत्नीचे शिक्षण हे वादाचं कारण ठरलं आहे. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यात दोघांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे.
पत्नी पदवीधर आहे. तिचे इंग्रजी शाळेत शिक्षण झाले. तर पती आठवी पास असून व्यवसायाने व्यापारी आहे. वाद झाला की पत्नी इंग्रजीत बोलते, असा आरोप तिच्या नवऱ्याने केला आहे. ती इंग्रजीत शिव्या शाप देत असल्याने नवरा अधिकच रागावला आहे. त्यामुळे दोघांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आला आहे. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले. जिथे दोघांमध्ये तडजोड करण्यात आली. पती कमी शिकलेला आहे याचा अर्थ ती त्याचा अपमान करेल असा होत नाही, असे त्या तरुणीला समजावून सांगण्यात आले.
खरं तर नोव्हेंबर २०२३ मध्ये तरुणीचं लग्न झालं होतं. मुलीचे वडील व कुटुंबीयांनी तरुणाचा व्यवसाय पाहून मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. दोघेही सुखात राहतील असे त्यांना वाटत होते. मात्र, पतीच्या शिक्षणावर पत्नी खूश नव्हती. या वरून घरात वाद सुरू झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी मुलगी आई-वडिलांच्या घरी आली. मी पोलिसांत तक्रार केली होती. समुपदेशनात पतीने आरोप केला की, पत्नी इंग्रजीत वाईट बोलून त्याचा व त्याच्या घरच्यांचा अपमान करते. पत्नी ही पतीला आणि त्याच्या घरच्यांना इंग्रजीत मूर्ख म्हणायची. जेव्हा पती हा तिच्याबरोबर शॉपिंगला गेला तेव्हा त्याने खरेदी करतांना पैशांचा विचार केला नाही. वादाचे कारण जाणून घेतल्यानंतर मुलीची देखील बाजू ऐकून घेण्यात आली व तिचे समुपदेशन करण्यात आले. ती शिकलेली असेल तर नवऱ्याच्या व्यवसायात मदत करावी, असे तिला पटवून देण्यात आले. तो कमी शिकलेला असेल तर त्याचा अपमान करू नका असे तिला पटवून देण्यात आले. अखेर दोघांमध्ये समझोता झाला व मोडणारा संसार वाचला.
सुलतानपूरमध्ये एका वधूने पतीचे शिक्षण कमी असल्याने तिच्या घरच्या दारापर्यंत आलेली लग्नाची मिरवणूक परतवून लावली. खरं तर लग्न १७ नोव्हेंबरला होतं. तरुणी पदवीधर होती आणि तरुण दहावीत नापास झाला होता. ठरलेल्या तारखेला लग्नाची तयारी झाली. दोन्ही कडचे पाहुणे मंडळी आली. वधू पक्षाने वरपक्षाचे जोरदार स्वागत केले. मात्र, वरमाला झाल्यानंतर वधूने नवरदेव मतिमंद व कमी शिक्षित असल्याचे सांगून लग्न करण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली. खूप समजावूनही मुलीने न ऐकल्याने वर पक्षाला माघारी जावे लागले.