खळबळजनक! पतीनं घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीनं दोन मैत्रिणींच्या मदतीनं पतीच गुप्तांग ब्लेडनं कापलं-husband raised questions on character wife cut his private part 2 friends also supported ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! पतीनं घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीनं दोन मैत्रिणींच्या मदतीनं पतीच गुप्तांग ब्लेडनं कापलं

खळबळजनक! पतीनं घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीनं दोन मैत्रिणींच्या मदतीनं पतीच गुप्तांग ब्लेडनं कापलं

Aug 17, 2024 12:17 PM IST

gorkhpur woman cut husband private part : गोरखपूर येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या नावऱ्याचं गुप्तांग कापलं.

gorkhpur woman cut husband private part : पतीनं घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीनं दोन मैत्रिणींच्या मदतीनं पतीच गुप्तांग ब्लेडनं कापलं
gorkhpur woman cut husband private part : पतीनं घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीनं दोन मैत्रिणींच्या मदतीनं पतीच गुप्तांग ब्लेडनं कापलं

gorkhpur woman cut husband private part : पती पत्नी म्हटलं की वाद हे ओघानेच आले. मात्र, एका पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं चांगलचं महागात पडलं आहे. पत्नीनं आपल्या मैत्रिणींच्या मदतीने पतीचं गुप्तांग ब्लेडनं कापलं. ही घटना शहरातील गोला परिसरात घडली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करणे गोरखपूरच्या गोला भागातील एका तरुणाला महागात पडले. पत्नीने तिच्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पतीवर हल्ला करून त्याचं गुप्तांग ब्लेडने कापलं. पतीने कसा तरी जीव वाचवत थेट हॉस्पिटल गाठलं. या तरुणाने पत्नी आणि तिच्या मैत्रिणीविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने पोलिस देखील चक्रवले आहे.

गोरखपूर येथील गोला परिसरातील एका तरुणाला गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला होता. याबाबत तो त्याच्या पत्नीला रोज टोमणे मारत होता. तसेच तिच्याशी सारखा वाद घालत होता. गुरुवारी (दि १५) पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पती कामावर गेला आणि काही वेळाने घरी परतला. दरम्यान, त्रासलेल्या पत्नीने तिचा हा त्रास तिच्या दोन मैत्रिणींना सांगितला. त्यांनी त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांंनइ त्याच्यावर हल्ला करण्याचा कट आखला. नवरा घरात येताच घरात लपून बसलेल्या पत्नी आणि तिच्या दोन मैत्रिणींंनइ नवरा बेसावध असतांना त्याच्यावर हल्ला करत त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर पत्नीने तिच्या जवळ असलेल्या ब्लेडने पतीचे गुप्तांग कापले. या सोबतच त्याला मारहाण देखील केली.

या घटनेत पती गंभीर जखमी झाल्यावर त्याने त्याला तिघींच्या तावडीतून सुटका केली. गुप्तांग कापल्याने तो वेदनेने विव्हळत होता. या अवस्थेत त्याने हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. तसेच या घटनेची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी दवाखान्यात येत त्याची चौकशी करत माहिती घेतली. यानंतर त्यांनी पत्नीसह तिच्या दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली आहे. पतीच्या नातेवाइकांनी पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विभाग