Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुरादाबादमध्ये एका तरुणाला कारच्या बोनेटवर फरफटत नेलं. या व्यक्तीला त्याची पत्नी दुसऱ्या सोबत फिरताना दिसली. त्यामुळे भडकलेल्या पतीने थेट कारवर उडी घेतली. कारचालक व महिलेच्या पतीसोबत वादावादी झाली. यानंतर कारचालकाने थेट तरुणाला बोनेटवर काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या बोनेटवर एक जण लटकलेला दिसत आहे. त्याला काही किलोमीटरपर्यंत लटकून फरफट नेलं. ड्रायव्हरने कार थांबण्याऐवजी भरधाव वेगाने कार चालवत राहिला. दरम्यान, काही किलोमीटर अंतरावर चालकाने गाडी थांबली असता बोनेटवर लटकलेला तरुण व कारचालक यांच्यात जोरदार वाद झाले. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे.
गेल्या आठ वर्षांपासून हे पती पत्नी वेगळे राहत होते. पतीने पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरतांना पाहिल्यावर पतीचं डोक सारकलं. पती थेट पत्नी असलेल्या कारच्या बोनेटवर चढला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर यूपी पोलिसांनी माझोला पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहे. हे प्रकरण कटघरचे असल्याचे माझोला पोलिसांनी सांगितले. याबाबत कटघर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.
व्हायरल झालेला व्हिडिओ माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळचा असल्याचे सांगितले जात आहे. मुरादाबाद-आग्रा राज्य महामार्गावर कार चालकाने महिलेच्या पतीला सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी त्याचा व्हिडिओ बनवला व तो सोशल मीडियावर पोस्ट केला. काही अवधीतच हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला. यात तरुण कसाबसा गाडीवर लटकून राहिला. तरी सुद्धा ड्रायव्हर गाडी चालवत राहिला. ड्रायव्हरने एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबवली. ज्यानंतर रस्त्यावर बराच गदारोळ झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ड्रायव्हर ज्या वेगाने कार चालवत आहे, त्या वेगाने बोनेटवर असलेल्या तरुणाचा हात थोडा जरी सुटला असता तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. तरुणाने बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने त्याचा जीव वाचला.
रात्री उशिरा एसपी सिटी कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की, ही घटना पती-पत्नीच्या वादातून झाली आहे. गेल्या आठ वर्षांपासून पत्नी पतीपासून वेगळी राहत होती. पतीने पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिल्याने तो गाडीच्या बोनेटवर चढला.
संबंधित बातम्या