गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. महिला गर्भवती होत नसल्या कारणाने पतीने तिची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये पत्नीचे वय अधिक असल्याचे दिसून आले. त्यानंतर पतीने महिलेविरोधात वय लपवणे व फसवणुकीची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या कुटूंबीयांवरही कारवाईची मागणी केली आहे. पतीने आरोप केला आहे की, पत्नीने तिचे खरे वय लपवले आहे. पतीच्या तक्रारीनुसार अहमदाबाद पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीत महिलेचे वय ३२ वर्षाऐवजी ४० वर्षाहून अधिक असल्याचे समोर आले.
पत्नीसह आठ जणांविरोधात गुन्हा -
अहमदाबाद शहरातील सरखेज परिसरात राहणारी महिला एक लग्नाच्या एका वर्षानंतरही गर्भवती होऊ शकली नाही, त्यावेळी ३४ वर्षीय पती तिला घेऊन डॉक्टरकडे गेले. मेडिकल रिपोर्टमध्ये समजले की, महिलेचे वय खूप अधिक आहे. ती वैद्यकीय मदतीशिवाय आई बनू शकत नाही. सोनोग्राफी रिपोर्टमधील खुलाशानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाच्या वेळी पत्नीचे वय ३२ असल्याचे सांगितले होते, मात्र सोनोग्राफीमध्ये तिचे वय ४० हून अधिक असल्याचे सांगितले गेले. पत्नीने आपले वय लपवून फसवणूक केल्याची तक्रार करत पतीने तिच्यासह माहेरच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पतीच्या तक्रारीनुसार विश्वासघात, फसवणूक, षड्यंत्र, गुन्हेगारी कट रचणे व धमकी संबंधित आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करत पत्नी, तिचे वडील व नातेवाईकांसह ८ लोकांविरोधात गुन्हे नोंद केले आहेत.
जून, २०२३ मध्ये झाले होते लग्न -
३४ वर्षीय पतीने पोलिसांनी सांगितले की, मे २०२३ मध्ये तो स्थळ पाहण्यास गेला होता. त्यावेळी पत्नीच्या बायोडाटामध्ये तिची जन्मतारीख १८ मे १९९१ दाखवली होती. जी त्याच्यापेक्षा १८ महिन्यांनी लहान होती. त्यानंतर १९ जून २०२३ रोजी दोघांचा विवाह झाला. मुलीच्या कूटूंबाने अट ठेवली की, लग्न पालनपूरमधील एका गावात ठेवावे. पतीने आरोप केला की, वारंवार मागणी करूनही पत्नीच्या नातेवाईकांनी तिच्या वयाचा व शिक्षणाचे दाखले दिले नाहीत. विवाहादिवशी त्यांनी शाळा सोडल्याचा दाखल व पासपोर्टची कॉपी मिळवली. त्यानुसार विवाह प्रमाणपत्रावर मुलीची जन्मतारीख १८ मे १९९१ नोंदवली गेली.
पतीने सागंतिले की, अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर पत्नी गर्भवती झाली नाही. तेव्हा त्याने घरात कोणालाही न सांगता पत्नी व मेव्हुणीला घेऊन जुहापुरा येथील एका डॉक्टरकडे तपासणी केली. मात्र पत्नीने पतीला रिपोर्ट दाखवले नाहीत. त्यानंतर पतीने सप्टेंबर महिन्यात पालडी येथील एका एक स्त्री रोग विशेषज्ञाचा सल्ला घेतला. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये समोर आले की, पत्नीने वय ४० ते ४२ वर्षाच्या आसपास आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पत्नी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाही. त्यानंतर पतीने जुहापुरा येथील डॉक्टरांकडूनही रिपोर्ट मिळवले. त्यामध्ये समजले की, दोन्ही रिपोर्टचे निष्कर्ष एक सारखेच आहेत.
६ वर्षे कमी केले वय -
पतीने आरोप केला आहे, त्याने पत्नीकडे अनेक वेळा मूळ प्रमाणपत्रे मागितली. मात्र पत्नी देण्यास टाळाटाळ करू लागली. तपासानंतर समजले की, पत्नीची जन्मतारीख १८ मे १९८५ आहे, जी १८ मे १९९१ अशी बदलण्यात आली. जेव्हा याचा जाब विचारला तेव्हा तिने हे कबूल करत माफी मागितली. पतीने या घटनाक्रमाशी संबंधित दोन तासांचा ऑडिओही पोलिसांना दिला आहे. पतीने सांगितले की, लग्नानंतर पत्नी नेहमी आपल्या आई-वडिलांकडे जात होती व त्याचबरोबर घरातील किंमती वस्तूही घेऊन जात होती.