woman attempts suicide during video call : गुजरातच्या वडोदरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका २८ वर्षीय महिलेने तिच्या पतीला व्हिडिओ कॉल करत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचा पती शहरातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. पती चहा प्यायला घरी न आल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पती घरी न आल्याने नाराज झालेल्या महिलेने त्याला व्हिडिओ कॉल केला आणि यादरम्यान गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
वडोदरा तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली जेव्हा २८ वर्षीय महिलेने तिच्या पतीला व्हिडिओ कॉल केला आणि कथितपणे गळफास घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचा पती शहरातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. तो चहा पिण्यासाठी घरी परतला नाही, असा आरोप आहे. यामुळे त्याची पत्नी नाराज झाली.
वडोदरा ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी.एच. चावडा म्हणाले, “या जोडप्याचे लग्न होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. आम्ही तिच्या पतीच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत....”
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका महिलेने आपल्या पतीला चहाचा कप मागितल्यावर त्याच्या डोळ्यात कात्रीने वार केले होते. त्यानंतर पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. महिलेच्या पतीने चहाचा कप मागितल्याने पत्नीला राग आला आणि तिने कात्री उचलून पतीच्या डोळ्यात वार केले. पती ताबडतोब जमिनीवर पडला आणि खूप रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.